*प्रकाश नगर मित्र परिवारच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते उद्घाटन*

0
21

========================

*चंद्रपूर*

=========================

श्री राम प्राणप्रतिष्ठापणा निमित्त विविध धार्मीक सामाजिक कार्यक्रामाचे आयोजन

==========================

श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठापणा निमित्त प्रकाश नगर मित्र परिवारच्या वतीने विविध सामाजिक आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी येथील रक्तदान शिबिराचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी धनजंय यादव, सदाशिव साहु, आकाश देवांगन, रुपेश निर्मलकर, राजू देवांगण, अनुज देवांगण, पवन ठाकुर, युवराज यादव, तोरण साहुजी, हरबन्स, संतोष सिन्हा, किष्णा गुप्ता, जितेंद्र सेन, पुसवू, टेकराम देवांगण, मन्नू पोती, मोनु यादव, आदींची उपस्थिती    होती.
प्रभु श्री रामलल्ला च्या प्राणप्रतिष्ठापणे निमित्त चंद्रपूरात विविध धार्मीक आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील प्रकाश नगर   येथे या निमित्त भजन, महाप्रसाद, रक्तदान शिबिर आणि स्मृती चिन्हांच्या लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सदर कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. आज देशासाठी गौरवाचा दिवस आहे. चंद्रपूरातही नागरिकांनी स्वयंपुढाकार घेत विविध ठिकाणी धार्मीक कार्यक्रम आयोजित केले. आपणही यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने गांधी चौक येथे 11 प्रकारच्या भातांचा महाप्रसाद वितरित केला असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. प्रकाश  नगर येथील नागरिकांनी उत्तम असे आयोजन केल्या बदल यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी आयोजकांचे कौतूक केले. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

============================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here