*ईडीयन डेंटल असोसिएशन २०२४-२६ चा प्रदग्रहण सोहळा संपन्न*

0
29

========================

*ईडीयन डेंटल असोसिएशन चंद्रपूर शाखेचा* 

==========================

रविवारी दि. २१/०१/२०२४ ला, सदस्यांचा पदग्रहण सोहळा स्थानिक सिध्दार्थ प्रिमिअर हॉटेल मध्ये मोठ्या दिमाखात पार पडला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील दंत वैद्यकीय डॉक्टर मंडळी आवर्जुन उपस्थित होते.

===========================

कार्यक्रमाला डॉ. अभय दातारकर, अधिष्ठाता शासकीय दंतवैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली तसेच महाराष्ट्र डेंटल कॉन्सिल चे सभासद डॉ. सुशिल मुंधडा, नागपूर येथील ख्यातनाम व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वक्ते डॉ.अतुल शृंगारपूर, डॉ. मुस्तफा बोहरा प्रामुख्याने उपस्थित होते.

==========================

मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मावळते अध्यक्ष डॉ. यशकुमार जैन व सचिव डॉ. कैलाश मालु यांनी गतवर्षी आयोजित केलेल्या संपूर्ण कार्याचा लेखाजोखा उपस्थित मंडळी समोर मांडला.

============================

त्यानंतर वर्ष २०२४-२०२६ सालासाठीचे. नवनियुक्त अध्यक्ष डॉ. राजेश टोंगे, सचिव डॉ. पियुष लोडे, कोषाध्यक्ष डॉ. सात्विक गुडावार व त्यांची संपूर्ण चमु यांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला.

==========================

नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. राजेश टोंगे यांनी उपस्थितांना संबोधित करताना लोकोपयोगी व मौखिक आरोग्याबद्‌दल जागरुकता वाढविव्याच्या दृष्टीने काम करण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.अभय दातारकर यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.

=========================

प्रमुख वक्ते डॉ. अतुल शृंगारपूरे व डॉ. मुस्तफा बोहरा यांनी दंतवैद्यकीय क्षेत्रातील नवनविन उपचार पद्धती संबंधी व्याख्याने दिले तसेच डॉ. सुशिल मुंधडा यांनी सगळ्यांना एकजुटीने संघटनेच्या, बळकटीसाठी काम कर करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात आयुर्वेदाचार्य डॉ. राजीव धानोरकर यांच्या कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.

==========================

नवनियुक्त सचिव डॉ. पियुष लोडे यांनी उपस्थित पाहुणे , सहकारी व उपस्थितांचे आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
कार्यक्रमाची धुरा डॉ.आशिष गजबे व डॉ. स्वप्नील कोटकर यांनी उत्तमरीत्या पार पाडली, तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. सोनाली उपरे व डॉ. अंकीता चांदेकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता असोसिएशन च्या पदाधिकान्यांनी अथक परीश्रम घेऊन ते साध्य केले.

===========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

==========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here