*राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार गटच्या वतीने प्रादेशिक अधिक्षक यांना निवेदन सादर*

0
29

===========================

    *चंद्रपूर*

===========================

चंद्रपुर शहरातील लालपेठ ओपन कास्ट येथे चड्ढा कंपनीच्या खोदकामाला शुरु केलेली आहे. तिथे मोठ्या प्रमाणात लोकांचे घरे असल्याने नागरीकांना प्रचंड त्रास होत आहे, त्यामुळे नागरीकांच्या मार्फ़तीने WCL च्या संदर्भात रोष व्यक्त केल्या जात आहे. शिवाय या उत्खननामूळे इथुन १०० मी वर असलेल्या लोकांच्या घराला तळे जात असून प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यामुळे लोकांचा आरोग्याला धोका निर्माण होत असुन जीवित हानि होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या सोबतच या सर्व प्रदूषणामुळे नागरीकांमधे विविध आजार पसरत जात आहे.
चालू असलेले खोदकाम बंद झाले पाहिजे यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या गटच्या मार्फ़तीने मा. प्रादेशिक अधिक्षक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, चंद्रपुर. यांना निवेदन देउन काम बंद करण्या संदर्भात सूचविले आहे. सात दिवसात प्रशासना मार्फ़त ठोस पाउले उचली नसल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या गटच्या तर्फ़े आंदोलन करण्याची चेतावनी देण्यात आलेली आहे.

============================

*यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या गटच्या चंद्रपुर शहर जिल्हाध्यक्ष दिपक जयस्वाल, युवक शहर अध्यक्ष कलाकार मल्लारप, गोपी पत्री, श्रीनिवास आसमपेली, विक्की गुरलवार, अमर जिलाल व अनेक कार्यकर्ता उपस्थित होते.*

=========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here