*भाजपा महानगर जिल्हा बाजार मंडळ चंद्रपूरतर्फे राबविला ‘गांव चलो अभियान’*

0
36

=========================

             *चंद्रपूर*

=========================

सन २०१४ ते २०२४ या दहा वर्षाच्या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशात सर्वच क्षेत्रात विकासाचा झेंडा रोवला.

=======================

कृषी कल्याण,गरीब कल्याण,महिला सशक्तीकरण,प्रधानमंत्री आवास योजना,गडकिल्ल्यांचे व तीर्थक्षेत्रांचे संवर्धन,आरोग्यम धनसंपदा,देशाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा अशा अनेक क्षेत्रात मोदी सरकारने ऐतिहासिक कामगिरी करत आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उंचावले.

========================

मोदी सरकारलादेखील महाराष्ट्र राज्य सरकारनेही उत्तम साथ देत आपल्या राज्यात मोठा विकास केला.त्या विकास कार्याच्या धर्तीवर केंद्र व राज्य सरकारांची यशोगाथा तळागाळापर्यंत पोहचविलेले विकास कामे आणि योजनांची माहिती ‘गांव चलो’ अभियानांतर्गत आज महानगर जिल्ह्यातील बाजार मंडळाच्या भगतसिंग चौक,समाधी वार्डात विविध क्षेत्रातील नागरिकांना घरोघरी सदिच्छा भेट देऊन विकास कामाची पत्रके वाटप करण्यात आली.

=======================

यावेळी भाजपा महानगर जिल्हा सचिव राजेंद्र खांडेकर,अनूसुचित जमाती मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष धनराज कोवे,भाजयुमो महानगर जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश कोलावार,शक्तीकेंद्र प्रमुख नकुल आचार्य,बुथ प्रमुख कार्तिक मुसळे,बुथ प्रमुख प्रसाद काटपाताळ,बुथ प्रमुख मयुर घरोटे,लक्ष्मण महालक्ष्मे,सागर घरोटे,प्रफुल कामडी,विवेक घरोटे,विशाल चांदेकर,प्रणय माणूसमारे, ओमकार घरोटे,साहिल घरोटे,अर्णव घरोटे,अतुल घरोटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=======================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here