*बल्लारपूर येथे छ्त्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भव्य मिरवणूक*

0
16

============================

*बल्लारपूर*

========================

बल्लारपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भव्यदिव्य रॅली ढोलतास डीजे व पालकी मिरवणूक काढण्यात आली.
येथील छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती द्वारे भव्य मिरवणूक काढण्यात आली. पालकी मध्ये शिवाजी महाराज यांची मूर्ती ठेवून सुरुवात झाली. मिरवणूक ची सुरुवात डॉ राजेंद्र प्रसाद वॉर्ड होऊन विद्यानगर वॉर्ड, पंचशील चौक, जयभिम चौक, महाराणा प्रताप वॉर्ड, बालाजी कॉम्प्लेक्स, रेल्वे चौक मार्गे जूना बस स्टँड होऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्या जवळ समाप्त झाली. या वेळी बल्लारपूर स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांना छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समिती तर्फे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.
प्रत्येक चौकात विविध खानपान आयोजित केले होते. राजेंद्र प्रसाद वॉर्ड मसाला भात वाटप. विद्या नगर वॉर्ड मट्टा वाटप. महाराणा प्रताप वॉर्ड बुंदी वाटप तर बालाजी वॉर्ड येथे स्मार्ट बाजार तर्फे कोल्डड्रिंग वाटप करण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती संस्थापक उमेश कुंडले, अध्यक्ष शुभम कंनोजवार, उपाध्यक्ष बादल मेश्राम, संदीप ताडुलवार, विक्की माणुसमारे, राहुल हेडाऊ, चेतन मंगाम, कार्तिक जिवतोडे, गौरव नाडामवार, निखिल मेकलवार,सोनू तुरानकर, योगेश चौधरी, अनिल कश्यप, योगेश हांडे,प्रथम शेंडे, मनीष कावळे, शंकर ताडूलवार, निलेश सोनटक्के, संदीप शेंडे, चिंटू पोतर्लावार, संकेत खणके, सुरज ताडूलवार सह सर्व शिवप्रेमी यांनी परिश्रम घेऊन योगदान दिले असून सर्वांन कडून उपस्थित सर्व शिवप्रेमी यांचे आभार मानले.

==========================

चंदन देवांगन 

=========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here