*वाचक महोत्सवाने रसिक मंत्रमुग्ध,लोकशिक्षण संस्थेचा नावीन्यपूर्ण उपक्रम*

0
22

===========================

वरोरा दिनांक 21 फेब्रुवारी
लोकशिक्षण संस्था वरोडा संचालित लोकमान्य इंग्रजी विद्यालयाच्या वतीने ‘असे वाचक घडलो आम्ही’ या उपक्रमाचे आयोजन लोकमान्य प्राथमिक विद्यालयाच्या प्रांगणात नुकतेच करण्यात आले होते
‘ येणे वाचने तोषावे ‘ या पहिल्या सत्रात नागपूर येथील इतिहासाचे अभ्यासक प्रवीण योगी, नागपूर आकाशवाणी केंद्राचे माजी संचालक डॉ संजय भक्ते तर हिंगणघाट येथील श्रेयस प्रकाशनाचे डॉ. चंद्रकांत नगराळे, या वाचकांनी त्यांच्या वैयक्तिक ग्रंथ संग्रहाबद्दल विचार व्यक्त करीत आपले अनुभव मांडले. त्यांच्यावर झालेल्या वाचन संस्काराचा आढावा याप्रसंगी मान्यवरांनी घेतला . लोक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा श्रीकांत पाटील यांनी बीज प्रास्ताविक केले तर संचालन डॉ श्रीनिवास पिलगुलवार यांनी केले
‘ वाचू आनंदे ‘ या दुसऱ्या सत्रात प्रा विजय देशपांडे, यवतमाळ, यांनी योगीराज बाबुल लिखित तमाशा विठाबाईच्या आयुष्याचा या चरित्रात्मक पुस्तकावर भाष्य केले. वैशाली जानवे, यांनी द आलकेमिस्ट या कादंबरीवर तर शंकर दिगदेवतुलवार यांनी एकीगाई या जपानी प्रेरणादायी पुस्तकाचा आढावा घेतला. दीपक नवले यांनी सदानंद देशमुख लिखित ग्रामीण वास्तवाचे विदारक चित्र मांडणाऱ्या बारोमास या कादंबरीवर भाष्य केले. या सत्राचे सूत्रसंचालन डॉ प्रशांत खुळे यांनी केले
‘लेखक वाचकाच्या भेटीला’ या तिसऱ्या सत्रात लेखकांच्या जाणिवांचा धागा जोडत प्रसिद्ध नाट्य लेखक प्रमोद भुसारी, नागपूर यांच्या भोवरा या नाट्यकृतीला विदर्भ साहित्य संघाचा पुरस्कार आणि प्रा डॉ प्रमोद नारायणे, वर्धा यांच्या मी पॉझिटिव्ह आलो या स्वानुभव कथात्मक प्रकाराला मिळालेला साहित्य संघाचा पुरस्कार याबद्दल त्यांची प्रकट मुलाखत डॉ जयश्री शास्त्री यांनी घेतली. यावेळी याप्रसंगी भुसारी यांनी वाचिक अभिनय तर डॉ नारायणे यांनी ‘ म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे’ या कविता संग्रहातील कवितांचे गायन केले.
अखेरच्या सत्रात विविध ठिकाणी होत असलेल्या प्रचलित विविध उपक्रमांचा परिचय मुक्त चर्चेतून रसिकांच्या पुढे मांडण्यात आला. डॉ संजय साबळे यांनी आपले स्वानुभव कथन याप्रसंगी केले. विविध चित्रफीत दाखविण्यात आल्या. या सत्राचे सूत्रसंचालन उमेश लाभे यांनी केले.
वाचक श्रोता आणि वाचक वक्ता असे स्वरूप असलेल्या या नाविन्यपूर्ण वाचक महोत्सवाला रसिकांनी भरभरून दाद दिली. पिंपळापुरे प्रकाशनाच्या वतीने ठेवण्यात आलेल्या ग्रंथ विक्रीला वाचकांनी भरीव प्रतिसाद दिला.
विदर्भातील वाचकांच्या आणि लेखकांच्या समृद्ध अनुभवाचे दर्शन या महोत्सवा च्या निमित्ताने अनुभवायला मिळाले

============================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here