*पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर व जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने पोलीस फुटबॉल ग्राउंड चंद्रपूर येथे “नव चैतन्य” पोलीस महोत्सव आयोजन*

0
13

=============================

*चंद्रपूर*

============================

आज रोज दिनांक 24/02/2024 शनिवारी चंद्रपुर पुलिस फुटबॉल ग्राउंड येथे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील यांची एक दिवसीय कार्यशाळा तसेच विद्यार्थ्यांसाठी पोलीस विभागाचे ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून त्यांना शपथ व बॅच वाटप करण्याचा कार्यक्रम तसेच चंद्रपूर पोलीस दलाचे नागरिकांसाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती देणारे प्रदर्शन भरविण्यात आलेले होते. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री सुधीरजी मुनगंटीवार सोबत चंद्रपूरचे आमदार मा. श्री किशोर जोरगेवार, चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री विनय गौडा, पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन,जिल्हा परिषद चे सीईओ श्री विवेक जॉनसन, मनपा आयुक्त श्री विपीन पालीवाल, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव श्री सुमित जोशी, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू यांची उपस्थिती प्रामुख्याने होती. या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना पालकमंत्री महोदय श्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की पोलीस विभागाचा हा उपक्रम खूप प्रशसनियआहे लोकांना याद्वारे जनजागृती करण्यात येत आहे हे खूप चांगले कार्य आहे आणि पोलीस अधीक्षक सुदर्शन यांच्या अशा नाविन्य योजनांना आमचा नेहमीच पाठिंबा राहील ते पुढे म्हणाले की नव्यानेच रुजू झालेले पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी गुन्हेगारावरती आपले सुदर्शन चक्र चालवलेले आहे आणि त्यांनी कोणत्याच गुन्हेगारावरती दयामाया दाखवायची नाही आहे चंद्रपूर जिल्ह्यातून गुन्हेगारीला हद्दपार करायचा आहे आणि यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत ते पुढे म्हणाले की दारूबंदीच्या काळात चंद्रपूर जिल्ह्यातील अपघाताचे प्रमाण कमी होते मात्र दारूबंदी उठतात अपघाताचे प्रमाण हे दुपटीने वाढले ही गोष्ट सर्व नागरिकांनी विचार करण्याची आहे. यानंतर चंद्रपूरचे आमदार श्री किशोर जोरगेवार यांनी पोलीस पाटलांना मार्गदर्शन करताना म्हटले की पोलीस पाटील हा गावातील व गृह विभाग आणि महसूल विभाग यांना साधणारा महत्त्वाचा दुवा आहे. तो वेळोवेळी गृह विभागाला आणि महसूल विभागाला मदत करत असतो त्यामुळे पोलीस पाटलाचे स्थान हे प्रशासनामध्ये महत्त्वाचे आहे. यानंतर पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी आपले मनोगत व्यक्त करताना नवचैतन्य ही संकल्पना उघडून सांगितली त्यांनी म्हटले की आपल्या देशाला वाचवायचे असेल तर आपल्याला आपल्या देशातील विद्यार्थी युवक यांना वाचवले पाहिजे तरच आपला देश महासत्ता होऊ शकतो म्हणून आम्ही प्रत्येक कॉलेजमध्ये शाळेमध्ये आमचे पोलीस विभागाचे ब्रँड अँबेसिडर नेमलेले आहे जे की मुलांना विद्यार्थ्यांना प्रेरणा देतील की त्यांनी कोणतेही व्यसन करू नये त्यांनी दुचाकी चालवताना नेहमी वाहतूक नियमांचा पालन करावे. तसेच त्यांनी आपल्या भाषणात असे म्हटले की महात्मा गांधींनी म्हटले की Be the change that you want see in the world म्हणजे तुम्हाला जर जगात बदल घडवायचा असेल तर त्याची सुरुवात स्वतःपासून करावी आणि याच धरतीवर त्यांनी सांगितले की आम्ही नागरिकांना हेल्मेट सक्ती करणार आहोत पण त्याची सुरुवात आम्ही आमच्या पोलीस विभागामार्फत केली आणि आतापर्यंत 100 पोलीस अंमलदारांना हेल्मेट न लावल्यामुळे चालान केलेले आहे येणाऱ्या काळात प्रत्येक नागरिकांना आता हेल्मेट ची सक्ती करणार आहेत हेल्मेट हे पोलिसांना चालन देण्याचे वाचण्यापासून नसून तर आपला जीव वाचवण्यासाठी आहे कारण माणसाच्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा भाग हे त्याचा मेंदू आहे आणि त्यामुळेच त्याला आपण सांभाळले पाहिजे. यानंतर माननीय जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की पोलीस विभागाचा हा उपक्रम नाविन्यपूर्ण आहे आम्ही स्वतः अधीक्षक साहेब मीटिंग घेऊ चंद्रपूर जिल्ह्यात होणाऱ्या रस्त्या अपघाताचे प्रमाण कसे कमी करता येईल व आपल्याला लोकांचे प्राण कसे वाचता येईल यावरती मीटिंग घेऊन सदर उपक्रम राबविण्याचे ठरविले सोबत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी पोलीस पाटील यांना प्रशिक्षित करण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळा घ्यायची असे ठरवून आजचा हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यानंतर जिल्हा परिषद सीईओ विवेक जॉनसन यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांनी केले तर आभार प्रदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी ठोसरे यांनी केले कार्यक्रमाला चंद्रपूर शहरातील विविध शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला तसेच माननीय पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते पोलीस पाटील मार्गदर्शक पुस्तिका सोबत कोर्ट भैरवींना आणि पोलीस विभागाला नवीन वाहने हस्तांतरित करण्यात आले. त्यासोबत शाळा महाविद्यालयातून निवडलेले पोलीस विभागाचे ब्रँड ॲम्बेसिडर यांना पालकमंत्री महोदय पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ब्रँड अँबेसिडर चे बॅचेस त्यांना देण्यात आले या प्रदर्शनीमध्ये विविध पोलीस विभागातील शाखांचे स्टॉल लावण्यात आलेले होते त्यामध्ये विद्यार्थी तसे नागरिक यांनी गर्दी केलेली होती यामध्ये प्रमुख आकर्षण पोलीस विभागातील विविध शस्त्रांचा स्टॉल हे होते. यामध्ये प्रत्येक स्टॉल हा संदेश देत होता. जसा की शस्त्रागार यांचा स्टॉल शिस्त संयम नियंत्रण हा संदेश देत होते सोबत c60 यांचा स्टॉल युनिटी आणि टीम वर्क, वाहतूक हेल्मेट सीट बेल्ट ट्राफिक रूल याचा आम्हाला करावा सायबर एनी सोशल मीडिया से नो कॉल वन नाईन थ्री झिरो ड्रग्स नो टू ड्रग भरोसा सेल स्टॉल वी बिल्ट फॅमिली, दामिनी पथक स्टॉल वी आर शाडो डोन्ट वरी डायल १०९८ ,112 स्टॉल ऑलवेज ओपन युवर आईज स्टे अलर्ट असे संदेश हे स्टॉल देत होते तसेच येणारा प्रत्येक विद्यार्थी हा शपथ घेऊन त्याखाली आपली सही नोंदवीत होता या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पोलीस विभागातील सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी परिश्रम घेतले.

===========================

सदर पोलीस पाटील कार्यशाळा मध्ये पोलीस पाटील संघटना अध्यक्ष श्री योगेश मत्ते, उपाध्यक्ष श्री नितेश वाटोरे, जिल्हा सचिव यांचे समवेत जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील उपस्थित होते

==========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here