तामिळनाडू येथील होणा-या राष्‍ट्रीय टेनिस बॉल, महिला क्रिकेट संघाकरीता रुचिता आंबेकर यांची निवड

0
23

===========================

भाजपा कार्यालय गिरणार चौक येथे शुभेच्‍छा पत्र देऊन सन्‍मान करण्‍यात आला ============================

तामिळनाडू  येथे  होणा-या ३४ व्‍या   वरिष्‍ठ  राष्‍ट्रीय टेनिस बॉल,  महिला क्रिकेट चॅम्‍पीयनशिपसाठी विदर्भ  महिला संघामध्‍ये  रुचिता संजिव आंबेकर यांची निवड झाली आहे.  तामिळनाडू  येथे  त्‍या   विदर्भ  महिला संघाद्वारे  आपल्‍या खेळाडू वृत्‍तीचे प्रदर्शन करतील. त्‍यांच्‍या या निवडीकरीता राज्‍याचे वने, सांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूर-वर्धा जिल्‍हयाचे पालकमंत्री मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे. ============================

दि.  २४ फेब्रुवारी २०२४ रोजी गिरणार चौक येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयामध्‍ये रुचिता आंबेकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्‍छा पत्र देऊन सन्‍मान करण्‍यात आला. यावेळी राजेश्‍वर सुरावार, भाजपा युवा  मोर्चा महानगर  सचिव आकाश ठुसे, संजू अहीर, नौशाद शेख आदिंची उपस्थिती होती.  तामिळनाडू येथे सर्वोत्‍कृष्‍ठ खेळी करुन चंद्रपूर जिल्‍हयाचे नाव मोठे करावे असे यावेळी राजेश्‍वर सुरावार यांनी शुभेच्‍छा देतांना मत व्‍यक्‍त केले., तर महिलांनी सर्वच क्षेत्रामध्‍ये गगण  भरारी घ्‍यावी असे आकाश ठुसे म्‍हणाले.

==========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

==≠=====================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here