*श्री स्वामी समर्थ जेष्ठ नागरीक संघाची कार्यकारिणी जाहिर*

0
20

===========================

*श्री स्वामी समर्थ जेष्ठ नागरीक संघाची कार्यकारिणी जाहिर*

===========================-

*दिवाकर राऊतकर अध्यक्षपदी विराजमान तर बबनराव धर्मपूरीवार ह्यांची आजिवन सल्लागार म्हणुन नियुक्ती*

===========================

चंद्रपूर येथिल श्री स्वामी समर्थ जेष्ठ नागरीक संघ, तुकूम ची मासीक सभा दि. 10 मार्च रोजी सकाळी 10:00 वाजता जेष्ठ नागरीक सामाजिक भवन तुकूम चंदपूर येथे बबनराव धर्मपूरीवार यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेला विजयराव चंदावार, जनार्धन पंधरे, रमेश ददगाल तसेच दिवाकर राऊतकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सभेचे अहवाल वाचन संघाचे सहसचिव लक्ष्मणराव सोनूले यांनी केले. अनेक विषयावर चर्चा करून ठराव पारीत करण्यात आले.

============================

सभेला पुरूष सदस्य तथा महिला सदस्य असे एकून 45 सदस्य उपस्थित होते. ज्या सदस्याचा मार्च 2024 मध्ये जन्मदिवस होता अशा 8 सदस्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच संघामध्ये निर्मला हाजरा व  सुखदेव कन्नाके ह्या दोन सदस्यांना सामील करून घेण्यात आले. सभेला उपस्थित मान्यवरांनी सदस्यांना मार्गदर्शन केले. स्वामी समर्थ जेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष बबन धर्मपूरीवार यांनी वैयक्तीक कारणास्तव अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे जुनी कार्यकारणी बरखास्त करून नविन कार्यकारणीची निवड करावी असे सुचविल्यामुळे नविन कार्यकारणीची निवड करण्यात आली.

==========================

संघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव धर्मपूरीवार ह्यांची आजीवन सल्लागार म्हणून निवड करण्यात आली. तसेच सन 2024 ते 2026 पर्यंतच्या कार्यकारिणीच्या  अध्यक्षपदी दिवाकर श्रीरामजी राऊतकर, भोलाराम सोनले, सचिव, उपाध्यक्ष बाबाराव नैताम, शामराव वाढई, लक्ष्मण सोनुले ह्यांची कोषाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली असुन सुभाष कासनगोट्टूवार, जनार्धन पंधरे, विजय चंदावार,  रमश ददगाल, श्रीकृष्ण जांभुळकर ह्यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झाली.

===========================

संस्थेला कायदेविषयक सल्ला देण्याचे दायित्व ॲड. किरण बाबुराव पाल, संघटक रामेश्वर खोडे, कार्यकारिणी सदस्य गणेश बन्सोड, बंडूजी वाढई,  पांडूरंग पंढरे, महिला प्रतीनिधी शालीनी कोहळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सर्व नवनियुक्त पदाधिकारी तथा कार्यकारीणी सदस्यांचे स्वागत करण्यात आले.

============================

श्री. स्वामी समर्थ जेष्ठ नागरीक संघाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. त्या पैकीच एक उपक्रम म्हणजे लाक वर्गणी मधून यावर्षी संघाच्या वतीने महाकाली मंदिर चंद्रपूर येथे दि. 15/03/2024 ला जुन कपडे वाटप तथा अन्नदानाचा कार्यक्रम संघाचे वतीने आयोजित केलेला आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये झालेल्या अयोध्या सहली बाबतची माहिती देण्यात आली. तसेच दि. 25/03/2024 ला होणाऱ्या धुलीवंदन कार्यक्रमास सर्व सदस्यांनी हजर राहावे असे कळविण्यात आले. त्या नंतर श्री. स्वामी समर्थ जेष्ठ नागरीक संघाच्या सर्व उपस्थित महिला सदस्यांचे जागतिक महिला दिनानिमित्य पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. आभार प्रदर्शन बाबाराव नैताम नवनियुक्त उपाध्यक्ष यांनी केले व सभेचा समारोप जाहिर केले. असे संघाचे नवनियुक्त अध्यक्ष दिवाकर श्रीरामजी राऊतकर यांनी कळविलेले आहे.

=============================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here