=========================
*महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चंद्रपुर दौऱ्या निमित्त चंद्रपुर शहरातील दुकानदार यांना मुख्य रस्त्यावर अतिक्रमण न करण्याचे प्रशासनाचे आवाहन*
==========================
पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर दिनांक:- १२/०३/२०२४
=========================
आपणास याव्दारे कळविण्यात येते की, आज दि.१२.०३.२०२४ रोजी अतिमहत्वाचे व्यक्ती (V.IP.) चा चंद्रपूर शहरात दौरा कार्यक्रम नियोजीत आहे, त्यामुळे अतिमहत्वाचे व्यक्तीने सुरक्षेच्या दृष्टीने दौरा कार्यक्रमादरम्यान आवागनमनाचे मार्गात रहदारीस अथवा अतिमहत्वाचे व्यक्तीचे कारताफा ला कोणताही अडथळ्य निर्माण होणार नाही याची प्रशासनाकडून पुरेपुर खबरदारी घेण्यात येत आहे,
==========================
चंद्रपुर शहरातील वाहतुकीची समस्या हा गंभीर विषय असून आपली प्रतिष्ठाणे मुख्य मार्गालगतचे असल्याने आपले प्रतिष्ठाणातील बरेचसे साहित्य, दुकानाचे फलक फुटपाथ तसेच फुटपाथ लगतचे रोडवर ठेवत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचप्रमाणे आपले /दुकानात येणारे ग्राहकाचे दुचाकी/चारचाकी वाहने तसेब आपली तथा आपले दुकानातील नोकरांची दुचाकी / चारचाकी वाहन रोडवर ठेवण्यात येत असल्याने देखील वाहतुकीची कोंडी निर्माण होण्यास कारणीभुत ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे.
=============================
त्यामुळे दि.१२.०३.२०२४ रोजी अतिमहत्वाचे व्यक्ती (V.I.P.) या चंद्रपुर शहरात दौरा कार्यक्रमादरम्यानची सुरक्षा उपाययोजना म्हणून दि 12/03/2024 रोजी सायकाळी ०६.०० वा पासून रात्री १०.०० वाजेपावेतो आपले प्रतिष्ठाण / दुकानासमोर कोणतेही साहित्य, दुबाकी चारचाकी वाहने उभी राहणार नाही याची खबरदारी आपण स्वत घ्यावी आपले दुर्लक्षीतपणामुळे जर आपले प्रतिष्ठाण / दुकानासमोर कोणतेही साहित्य, दुचाकी/चारचाकी वाहने उभी राहिल्यास आणि त्यामुळे वाहतुकीची कोडी निर्माण होवून अतिमहत्वाचे व्यक्तीचे कारताफा ला अडथळा निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर निश्चित करुन योग्य कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहाल याची व्यक्तीश नोंद घ्यावी,
============================
म्हणुन मी, प्रभावती एकुरके, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर आपल्या वरील कुत्यामुळे होणाच्या कायदा व सुव्यवस्थेने प्रश्नामुळे हस्तक्षेपीय अपराधास प्रतिबंध व्हावा या दृष्टीकोणातून कलम १४९ सि आर पी सी चे प्रचलीत तरतुदीस अधिन राहून मला प्राप्त अधिकारा अन्वये कलम ६८ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्तये माझे सही व शिक्यानीशी हा नोटीस आपणास देत आहो सदर नोटीस चे पालन न केल्यास आपणाविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल व सदर नोटीसची प्रत आपणा विरुध्द पुरावा म्हणून मा. न्यायालयात सादर करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी
============================
फेडेरेशन ट्रेड अँड कॉमर्स, राम किशोरसारडा रामजीवन परमार पंकज शर्मा भरत शिंदे दिनेश बजाज चिराग नथवानी प्रभाकर मंत्री शशी ठक्कर अरविंद सोनी समीर साळवे मनीष राजा गिरीश उपगलावर
=============================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
=========================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,