मा.ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सांस्‍कृतिक विभागाकडून मंजुर केले ३० कोटी रुपयांची दोन सांस्‍कृतिक सभागृह

0
17

===≠========================

शेतकरी व सामान्‍य नागरिकांनी मानले आभार

==========================-==

कृषी विभाग चंद्रपूर परिसरातील खुल्‍या जागेवर कृषी हाट उभारण्‍याकरीता राज्‍याचे वने, सांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर व वर्धा जिल्‍हा मा.ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सांस्‍कृतिक विभागाकडून ३० कोटी रुपयांचे दोन सांस्‍कृतिक सभागृहाला मंजुरी दिली आहे.

===========================

दि. १५ मार्च २०२४ रोजी कृषी हाट बाजारातील सभागृहाकरिता निधी मंजुर करण्‍यात आला. त्‍यात प्रशिक्षण केंद्र, गोदाम, मार्केट हाट, वसतीगृह, विविध कार्यालय, प्रदर्शनी सभागृह व सांस्‍कृतिक सभागृह करण्‍याचे ठरवीले आहे. त्‍याचा पहिला टप्‍पा म्‍हणून १५ कोटी मंजुर करण्‍यात आले आहे. या कृषी हाट निर्मितीमुळे शेतक-यांना व सामान्‍य नागरिकांना उपयोग होणार आहे. या कृषी हाट निर्मितीकरीता उर्जानगर, दुर्गापूर व तुकूम क्षेत्रातील नागरिकांनी मागणी केली होती. उर्जानगर येथील केसरीनंदन नगर येथे सुध्‍दा १५ कोटी किंमतीच्‍या सभागृहाकरिता मंजुरी देण्‍यात आली आहे. सदर सभागृह वातानुकूलित असतील. विजेच्‍या वापराकरिता सोलरचा उपयोग करण्‍यात येईल. सभागृहाच्‍या परिसरामध्‍ये रुंद पोचमार्ग, भव्‍य प्रवेश द्वार व परिसराचे सौंदर्यीकरण करण्‍यात येईल. हे सभागृह ४०० आसन व्‍यवस्‍थेचे असेल. सोबतच १५० लोक बसु शकतील अशा स्‍वरुपाची बैठक व्‍यवस्‍था व १००० हजारा लोकांच्‍या भोजना व्‍यवस्‍थेकरिता शेडचे बांधकाम करण्‍यात येणार आहे. या मंजुरीमुळे परिसारातील नागरिकांनी आनंद व्‍यक्‍त केला असून मा.ना. सुधीर मुनगंटीवार यांचे महानगर भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष राहुल पावडे, ग्रामीण भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष हरिश शर्मा, महामंत्र रामपाल सिंह, मंगेश गुलवाडे, ब्रिजभुषण पाझारे, प्रज्‍वलंत कडू, सुरज पेदुलवार, किरण बुटले, तालुका अध्‍यक्ष हनुमान काकडे, नामदेव आसुटकर, विलास टेंभुर्णे, रोशनी खान, वनिता आसूटकर, केमा रायुपरे, उत्‍तम पाटील, मदन चिवंडे, नंदु इंगळे, संजय यादव, श्रीनिवास जंगम, फारुख शेख, सुनिल बरियेकर, देवानंद थोरात, लक्ष्‍मी सागर, अनिता भोयर, मुक्‍ता येरगुडे, निखिल पतरंगे, गिता सिंग यांनी केले. ============================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here