*भाजपा नेते महेश कोलावार यांच्याही मागणीला यश*

0
30

========================

*आशा कामगारांच्या वेतनात झाली वाढ*
*४ वर्षापूर्वी निवेदनाद्वारे राज्य सरकारकडे केली होती मागणी*

===========================

          *चंद्रपूर*

==========================

४ वर्षापूर्वी आशा कामगारांच्या वेतनात वाढ करण्याबाबत भाजपा नेते महेश कोलावार यांनी राज्य सरकारकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती.सोबतच राज्यातील अनेक कर्मचा-यांनी देखील आंदोलने करून राज्य सरकारकडे मागणी केली.त्यांच्या या मागणीला यश आले आहे.काल मंत्रीमंडळाने सदर निर्णय घेतला असून पाच हजार रुपयाने मानधनात वाढ झाली आहे.

==========================

आशा कामगार हे भारत सरकारने २००५ साली सुरु केलेली ही योजना राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनचा एक भाग आहे.भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय ही योजना राबवते.भारतातील “प्रत्येक खेड्यात आशा”
असे या योजनेचे उद्दीष्टे आहे.आशा स्वयंसेविका माता व बाल आरोग्याविषयी गावातील महिलांमध्ये प्रबोधन करणे,प्रसूतीपूर्व तपासणी,लसीकरण,स्तनपान,लोहयुक्त गोळ्या इ.ची माहिती मातांना देणे असे काम आशा कामगार करतात.

======≠===================

मागील १५ वर्षापासून आशा कामगार हे कार्यरत आहेत.काही वर्षांपासून आशा कामगार फक्त २००० हजार इतक्या अल्प मानधनावर काम करतात.तर करोना काळात या आशा सेविका आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने रुग्णांचे सर्वेक्षण करत असून धोक्याच्या ठिकाणी काम करत असतानांही अत्यल्प मानधनावरच आपली समाधानी केली आहे.या मानधनामुळे आशासेविका कुठेच संतुष्ट नाही.व तसेच या मानधनामुळे त्यांचा आर्थिक खर्चाच्या गरजा पण भागत नाही.तरी या आशा कामगारांच्या वेतनात वाढ होऊन किमान ६००० हजार रुपये महिना करावा
अशी मागणी महेश कोलावार यांनी केली होती.सोबतच अनेक कर्मचा-यांनी देखील आंदोलने करून सरकारकडे विनंती केली होती.आज सर्वांच्या प्रयत्नांना यश आले असून मंत्रीमंडळाने घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.सदर निर्णयाबाबत महेश कोलावार यांनी सरकारचे आभार मानले आहे.

=============================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here