============================
*चंद्रपूर*
=============================
आमदार प्रतिभा धानोरकर यांना भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षा तर्फे चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेसाठी उमेदवारी जाहिर झाली असून इंडिया आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून उद्या दि. 27/03/2024 रोजी नामांकन अर्ज दाखल करणार आहे.
इंडिया आघाडी च्या उमेदवार म्हणून भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षातर्फे आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी प्राप्त झाल्याने उद्या सकाळी 11.00 वा. कोहीनुर ग्राऊंड, दादमहल वार्ड, चंद्रपूर येथून रॅलीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, माजी आमदार बाळासाहेब मुनगिरवार, माजी आमदार ख्वाजा बेग, आमदार सुभाष धोटे, आमदार सुधाकर अडबाले, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी आमदार वामनराव कासावार, रितेश तिवारी, राजेंद्र वैद्य, दिपक जैयस्वाल, संदीप गिÚहे, दिलीप चौधरी, प्रमोद पाटील, सोहेल शेख, अरुण भेलके, प्रकाश रेड्डी, रविंद्र उमाटे, के.के. सिंह, मयुर राईंचवार, सुनिल मुसळे, प्रविण शिंदे यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. सकाळी 11.00 वा. हि रॅली कोहीनुर मैदानाजवळून गांधी चौक मार्गे जाणार असून सदर रॅलीचा समारोप न्यु इंग्लिश शाळेचे मैदान, वरोरा नाका चौक, चंद्रपूर येथे होणार आहे. यानंतर दु. 3.00 वा. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्ती जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान इंडिया आघाडीच्या नेत्यांतर्फे करण्यात आले आहे.
==========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
==========================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,