नागपूर
बँकेच्या जडणघडणीत जुळलेले ग्राहकांचे नाते जपले असल्यामुळेच बँकेची विश्वसनीयता कायम ठेवल्यामुळे आज बँक उत्तरोत्तर प्रगती करीत असल्याचे मत बँकेच्या अध्यक्षा कु.पूजा प्रमोद मानमोडे यांनी व्यक्त केले.बँकेचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रमोद मानमोडे यांनी 27 मार्च 1999 ला स्थापन केलेली निर्मल अर्बन बँकेला त्यांचे नियमीत मार्गदर्शन लाभत आहे.बँकेची जानेवारी 2023 मध्ये संचालक मंडळाची सार्वजनिक निवडणूक होऊन बँकेच्या युवा अध्यक्ष कु पूजा प्रमोद मानमोडे यांची 2023 ते 2028 पर्यंत 5 वर्षासाठी अविरोध निवड झाली.त्यांना सहकार विभागातून सहाय्यक निबंधक पदावरून निवृत्त झालेले श्री तुकाराम चव्हाण यांची उपाध्यक्ष पदी अविरोध निवड होऊन नवनिर्वाचित संचालक मंडळाला त्यांची बँकेच्या कामकाजात साथ मिळाली आहे.
कु.पूजा मानमोडे यांनी विविध वर्गातील ग्राहकांकरिता ठेवी व कर्ज देण्याच्या अभिनव योजना आखलेल्या आहेत.प्रामुख्याने महिला वर्ग, शाळेत जाणारे पाल्य,जेष्ठ नागरिक यांचे साठी व्याजदरात सवालती दिल्या आहेत.
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,