*BLACKGOLD CINE VISION निर्मीत “मळकट” चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित*

0
31

             चंद्रपूर  

लेखक आणि दिग्दर्शक निखिल सुरेंद्र कडुकर कृत आगामी “मळकट – Colour Of Progress” या मराठी चित्रपटाचे Calligraphical पोस्टर Launching दिनांक २०/३/२०२४ ला प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह चंद्रपूर येथे झाले. त्या प्रसंगी श्री. सुरेंद्र कडुकर आणि सौ. वंदना सुरेंद्र कडुकर याच्या हस्ते रिबीन कापून पोस्टर चे अनावरण करण्यात आले त्यावेळी मंचावर विकास चहारे, शक्तिविर धिराल, रवींद्र धकाते, सम्राट नागमौर्य, विशाल हजबन, शुभम गोविंदवार, विनय तितरे, पंकज पेरगे, सपना उराडे, थोरवी सोनेकर, वैष्णवी चेपुरवार, मयूर हनेगावकर, विराज सुरपाल आणि Black Gold Cine Vision ची संपूर्ण टीम तिथे उपस्थित होती.
मळकट चित्रपटा विषयी माहिती देतांना लेखक, दिग्दर्शक निखिल सुरेंद्र कडुकर यांनी दोन वर्षा आधी एका ठिकाणी गोष्टी गोष्टीत एका situation वर चर्चा सुरू झाली आणि त्या चर्चेतून जन्म झाला मळकट चित्रपटाचा, मागील दोन वर्षांपासून निखिल आणि त्यांची टीम दिवस रात्र मळकट चित्रपटासाठी काम करत आहे. निखिल यांनी आता पर्यंत पल्याड, International फालमफोक, निबंध, नाद, बोर्डिंग या चित्रपटात कधी सहायक दिग्दर्शक तर कधी सह दिग्दर्शक म्हणून काम केले आहे तर नुकत्याच चंद्रपूर मधे चित्रित झालेल्या राजहंसा या हिंदी चित्रपटाचे त्यांनी Screenplay Writer म्हणून काम केले आहे. मळकट विषयी अधिक बोलतांना मळकट चित्रपट हा पूर्णतः मनोरंजक आणि कौटुंबिक असल्याने त्यांची जबाबदारी आणखी वाढली असल्याचे सांगितले.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here