*ओबीसी नेते राजेश वारलूजी बेले यांना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी*

0
37

 *चंद्रपूर*  

चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेश बेले हे 27 मार्च रोजी आपला नामांकन अर्ज दाखल केला.

सकाळी साडेदहा वाजता संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांना अभिवादन करून, माता महाकालीच्या चरणी नतमस्तक होऊन,पटेल हायस्कूल जवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भव्य अशा रॅलीच्या द्वारे गांधी चौकातून आंबेडकर चौक ते जटपुर गेट येथून जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत भव्य रॅली द्वारे राजेश बेले यांनी जिल्हाधिकारी कार्यलयात आपला नामांकन अर्ज दाखल केला.या रॅलीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे वरिष्ठ नेते, ओबीसी समाजाचे नेते, तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

राज्यात वंचित बहुजन आघाडी व महाविकास आघाडी यांच्यातील चर्चित जागावाटप फार्मूला फसल्याचे चित्र पुढे आले आहे. चंद्रपुरातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेश बेले यांना एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तेली समाजातील महत्त्वाचे नेते असलेल्या राजेश बेले यांनी आपल्या समर्थकांसह आज जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्याचे निश्चित केले आह बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी आज उमेदवारांची अधिकृत घोषणा केल्याने मविआ सोबत जाण्याची चिन्हे मावळली आहेत.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here