सौ. सपना मुनगंटीवार यांना ‘लोकमत ग्लोबल सखी एक्सलन्स अवार्ड’

0
15

समाजाच्या विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव

*चंद्रपूर*
चंद्रपूर, दि.२९ – कुटुंबाचा सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेत नव्या पिढीवर आदर्श असे संस्कार करणाऱ्या तिरुपती बालाजी देवस्थान बोर्डाच्या माजी विश्वस्त सौ. सपना सुधीर मुनगंटीवार यांना अलीकडेच सिंगापूर येथे ‘लोकमत ग्लोबल सखी एक्सलन्स अवार्ड’ने गौरविण्यात आले. पुरस्काराबद्दल समाजाच्या विविध स्तरातून सौ. सपना मुनगंटीवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या अर्धांगिणी सौ. सपना मुनगंटीवार यांना महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे दैनिक म्हणून नावलौकीक असलेल्या लोकमत समूहातर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्यामुळे त्याचे विशेष एक महत्त्व आहे. एक संवेदनशील महिला कार्यकर्ता, कुटुंबवत्सल व कर्तव्यदक्ष गृहिणी ही तर त्यांची ओळख आहेच, शिवाय कुठल्याही कार्यात कल्पक आणि उत्तम नियोजन हे देखील त्यांचे वैशिष्ट्य आहे.

समाजासाठी चांगले काहीतरी करण्याची धडपड त्यांच्या कृतीतूनच बघायला मिळते. आंध्र प्रदेशातील श्री तिरुपती बालाजी देवस्थानच्या विश्वस्त म्हणून त्यांनी पार पाडलेली जबाबदारी सर्वांचे विविध सामाजिक उपक्रमांतून अनेकांच्या जीवनात आशेचा किरण ‘लोकमत ग्लोबल सखी एक्सलन्स अवार्ड’साठी माझी निवड केल्याबद्दल मनापासून आभारी आहे. ‘मराठी’  माणसाचा अभिमान असलेल्या ‘लोकमत’ ला यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा’, या शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here