========================= महाराष्ट्र दिनी चंद्रपुरात गुंजनार स्वरांजलीचा सुमधुर आवाज. ============================ सांस्कृतिक मेजवानीसाठी चांदा क्लब ग्राउंड सज्ज ============================ अवंती – अंबर सामाजिक प्रतिष्ठानच्या सौजन्याने सारेगाम फेम गायकांची सजणार मैफल ============================ *चंद्रपूर* ========================== महाराष्ट्र दिनाच्या पावनपर्वावर चंद्रपुरकरांना स्वरांजली या सांस्कृतिक संगीत महोत्सवाची मेजवानी देण्यासाठी चंद्रपूर येथील चांदा क्लब ग्राउंड सज्ज झाला असून उद्या १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त सायंकाळी ६ वाजता पासून रात्री १० वाजेपर्यंत सारेगाम फेम गायकांची संगीत मैफिल सजनार आहे. ========================== चंद्रपूर जिल्हा वासियांसाठी सांस्कृतिक मेजवानीचे आयोजन अवंती – अंबर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे .========================== स्वरांजली या संगीत महोत्सवात सुर नवा ध्यास नवा, सा रे ग म प झी मराठी फेम, 57 व्या महाराष्ट्र राज्यात चित्रपट पुरस्कार विजेती , सुप्रसिद्ध पार्श्वगायिका मधुरा कुंभार, सारेगमप, इंडियन आयडल, सुर नवा ध्यास नवा फेम प्लेबॅक सिंगर प्रसेनजीत कोसंबी , द केरला स्टोरी प्लेबॅक सिंगर, सुर नवा ध्यास नवा उपविजेती सारेगमप फेम अंशिका चोणकर, यांच्या उपस्थित सुमधुर आवाजातील गाणे ऐकायला मिळणार आहेत. त्यामुळे चंद्रपुरातील रसिक माय बाप प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने स्वरांजली कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन स्वरांजली या संगीत कार्यक्रमाचे मुख्य आयोजक अवंती – अंबर सामाजिक प्रतिष्ठानचे महेश मेंढे यांनी केले आहे. ============================= *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ===========================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,























