आमदार किशोर जोरगेवार यांनी केली 26 कोटी 75 लक्ष रुपयांच्या निर्माणाधीन विकासकामांची पाहणी

0
32

===========================     दिक्षाभुमी येथील अभ्यासिकेचे काम अंतिम टप्यात, समाजभवानाचे काम 90 टक्के पुर्ण ============================

*चंद्रपूर*                 =========================                    विविध विभागाच्या निधी अंतर्गत मतदार संघात सुरु असलेल्या 26 कोटी 75 लक्ष रुपयांच्या निर्माणाधीन विकासकामांची आमदार किशोर जोरगेवार यांनी पाहणी केली असुन यातील बहुतांश विकासकामे पुर्णत्वास आली आहे. सदर कामे गतीशिलरित्या ठराविक वेळेत   पूर्ण करण्याच्या सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे.  ===========================          Bnयावेळी प्रा. राजेश दहेगावकर, प्रा बेले, विजय पोहणकर, महादेवराव पुनवटकर, माजी नगर सेवक नामदेव पिंपळे, यंग चांदा ब्रिगेडचे करण नायर, कार्तिक बोरेवार, जय मिश्रा, दाताळा सरपंच सुनिता देशकर, उपसरपंच विजयालक्ष्मी नायर, मधुरकर हिवरकर, सुशांत शर्मा, छाया डांगे आदींची उपस्थिती होती.     ==========================                आमदार किशोर जोरगेवार यांनी विविध विभागाअंतर्गत मतदार संघाच्या विकासासाठी मोठा निधी खेचून आणला आहे. या निधितून शहरी आणि ग्रामिण भागाचा विकास केल्या जात आहे. यातील अनेक कामे पुर्ण झाली आहे. तर काही कामे प्रगतीप्रथावर आहे. विशेषत: यात अभ्यासिका आणि समाज भावनांचा समावेश आहे. =========================                    दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी यातील काही निर्माणाधीन कामांची पाहणी करत आढावा घेतला आहे. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सामाजिक न्याय विभागाअंतर्गत 1 कोटी रुपयातुन मंजूर केलेल्या दिक्षाभूमी येथील अभ्यासिकेच्या कामाची पाहणी केली. सदर अभ्यासिकेचे काम अंतिम टप्यात असुन काही महिण्यातच ही अभ्यासिका पुर्ण होणार आहे. भव्य अशी ही अभ्यासिका असुन 1 लाख पुस्तके येथे ठेवण्यात येणार आहे. ही  अत्याधुनिक अशी अभ्यासिका असणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी म्हटले आहे. =========================                         तर आमदार निधीतून मंजूर 25 लक्ष रुपयांच्या लोहार समाज भवनाच्या कामाचीही आमदार किशोर जोरगेवार यांनी पाहणी केली असून इंदिरानगर येथे तयार होत असलेल्या या समाज भवनाचे काम प्रगतीपथावर आहे. सामाजिक भवानाच्या माध्यमातून समाज बांधवांना सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम घेण्यासाठी हक्काचे सभागृह उपलब्ध करुन देता येत असल्याचा आनंद यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला. तर शहर विकास निधीतून नगीनाबाग येथे 50 लक्ष रुपयातून होत असलेल्या द्विमजली अभ्यासिकेच्या कामाची आमदार किशोर जोरगेवार यांनी पाहणी केली. हे कामही पूर्णत्वास आले असून लवकरच ही ईमारत लोकार्पित होणार असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला. नागीनाबाग येथे सुंदर वास्तु देता आल्याचे समाधानही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केले. ===========================                      तर बजेट निधी अंतर्गत 25 कोटी रुपयातून मंजूर करण्यात आलेल्या एमआयडीसी सिमेंट काॅंक्रिट रोडच्या कामाचीही आमदार किशोर जोरगेवार यांनी पाहणी केली असुन सदर काम उत्तम दर्जाचे करण्याच्या सुचना कंत्राटदाराला केल्या आहे. सदर रस्त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुविधेत भर पडणार आहे. ============================                *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ===========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here