श्री महाकाली क्रिडा महोत्सवात घडलेल्या पै. हितेश सोनवणे या कुस्ती पटुने पटकविले राज्य स्तरीय सुवर्ण पदक आमदार किशोर जोरगेवार यांनी केला सत्कार

0
21

=============================

श्री महाकाली क्रिडा महोत्सवात घडलेल्या पै. हितेश सोनवणे या कुस्ती पटुने पटकविले राज्य स्तरीय सुवर्ण पदक 
===============================
आमदार किशोर जोरगेवार यांनी केला सत्कार

============================
 आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पेतून दरवर्षी चंद्रपूरात आयोजित होत असलेल्या श्री माता महाकाली क्रिडा महोत्सवातून घडलेल्या चंद्रपूरातील पै. हितेश  सोनवणे  या कुस्तीपटुने नाशिक येथे पार पडलेल्या वरिष्ठ ग्रीको रोमन राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत 60 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकाविले आहे. त्याचा आज शनिवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी कार्यालयात सत्कार केला आहे.
चंद्रपूरातील खेळांडूना प्रोत्साहण देण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने श्री माता महाकाली महोत्सवाचे आयोजन केल्या जात आहे. या क्रिडा महोत्सवा अंतर्गत, कबड्डी, कुस्ती, यासह विविध खेळांचे आयोजन केल्या जाते. दरम्यान चंद्रपूरातील कुस्तीपटुंना मोठे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी यंदा त्यांच्या वतीने भव्य राज्यस्तरिय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र केसरी सिंकदर शेख यांना आमंत्रीत करण्यात आले होते. यावेळी भव्य असे आयोजन पार पडले.
दरम्यान श्री महाकाली क्रिडा महोत्सवच्या दोन्ही सिजन मध्ये चंद्रपूरातील पै. हितेश सोनवणे या कुस्ती पटून 61 किलो वजन गटात प्रथम पारितोषिक पटकाविले होते. या क्रिडा महोत्सवात बाहेरच्या अनेक मोठ्या कुस्ती पटुंची डावपेच पहाता आले व शिकता आले. हे आयोजन चंद्रपूरच्या कुस्ती पटुंसाठी कार्यशाळा सारखे होते. त्यामुळेच नाशिक येथील स्पर्धेत मला यश  मिळवता आले. चंद्रपूरमध्ये पार पडलेल्या श्री माता महाकाली क्रिडा महोत्सवात अनेक मोठ्या कुस्ती पटुं सोबत खेळता आले. त्यामुळे आत्मविश्वास वाढला असे सुर्वण पदक विजता पै. हितेश सोनवणे यांनी म्हटले आहे. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ आणि माता महाकालीची मुर्ती भेट स्वरुप देत हितेश चा सत्कार केला.
चंद्रपूरच्या खेळांडुना मोठे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशातून आपण श्री माता महाकाली क्रिडा महोत्सव घेत असतो. आज हितेशच्या यशाने या महोत्सवाचा उद्देश पूर्ण झाला आहे. हितेशने चंद्रपूरला पहिले राज्य स्तरीय सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. त्याने चंद्रपूरचे नाव लौकीक केले असून चंद्रपूरात आणखी खेळाडू घडेल असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला आहे. यावेळी हितेश चे प्रशिक्षक सुहास बनकर यांचीही उपस्थिती होती.
=============================           *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*  =============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here