*श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पूण्यतिथी निमित्त निघालेल्या शोभायात्रेचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत*

0
41

=============================

 शोभायात्रेत सहभागी भाविकांना शितपेयाचे वाटप

==============================

*चंद्रपूर*  
==============================
अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या 146 व्या पूण्यतिथी निमित्त श्री स्वामी समर्थ अक्कलकोट परिवार चंद्रपूर च्या वतीने शहरातून शोभायात्रा काढण्यात आली होती. सदर शोभायात्रेचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने कार्यालयासमोर स्वागत करण्यात आले. यावेळी शोभायात्रेत सहभागी भाविकांना शितपेयाचे वाटप करण्यात आले.
यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे युवा नेते अमोल शेंडे, शिक्षक विभाग प्रमुख प्रतिक शिवणकर, बंगाली समाज महिला शहर प्रमुख सविता दंढारे, गौरव जोरगेवार, कल्पला शिंदे, कौसर खान, सतनात सिंह मिरधा, कैलास धायगुडे आदींची उपस्थिती होती.
अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पूण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान श्री स्वामी समर्थ अक्कलकोट परिवार चंद्रपूर च्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. विठ्ठल मंदिर वार्ड येथील श्री स्वामी समर्थ महाराज देवस्थान येथून या शोभायात्रेला सुरवात करण्यात आली. सदर शोभायात्रा यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालया जवळ पोहचताच यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी शोभायात्रेतील पालखीचे दर्शन घेत यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांच्या वतीने शोभायात्रेत सहभागी बांधवांना शितपेयाचे वाटप करण्यात आले.

============================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
==========================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here