*उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने आम आदमी पक्ष व पेपर मिल अधिकाऱ्यांची बैठक विफल ठरली*

0
24

=======================                                पेपरमील प्रशासनाची वागणूक मुजोरीची- आप* =========================               *बल्लारपूर*           =========================                        दि. 7/05/2024 – शहरातील पेपरमील चा लकडा स्टाॅक यार्डमुळे शहरात होणारे प्राण्यांचे हैदोस, प्रदुषण समस्या अश्या अनेक विषयांवर चर्चा करण्यासाठी आज उपविभागीय अधिकारी यांच्या मध्यस्थीने पेपरमील अधिकारी व आम आदमी पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत पेपरमील अधिकाऱ्यांची वागणूक मुजोरीची होती. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या समोर अधिकारी मुजोरपणाने बोलत होते. शहराच्या लोकवस्ती लगत असलेल पेपरमीलचे स्टाॅक यार्ड अवैध आहे, यामुळे नागरिकांना वन्यप्राण्यांचा हैदोस सहन करावा लागत आहे. तसेच कळमना सारखे आग लागण्याची घटना झाल्यास नागरिकांच्या जीवाला धोका असू शकतो, त्यामुळेच हे स्टाॅक यार्ड इथून त्वरित हटविण्यात यावे अशी मागणी शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांनी केली. आज झालेल्या बैठकीत पेपरमील च्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या नियोजनासंदर्भात कोणतीच माहिती दिली नाही. तसेच सीएसआर फंड चा पैसा कसा वापरला जातो याची माहिती देखील अधिकाऱ्यांना नाही. या पेपरमीलमुळे स्थानिक नागरिकांना प्रदुषणाचा सामना करावा लागतो इतरही त्रास आहेत. परंतु येथील अधिकारी लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांना योग्य उत्तर देत. पेपरमील मधील कामगारांचे आम्ही विरोधी नाही. आम्हाला पेपर बंद पाडायचा नाही फक्त हे स्टाॅक यार्ड हटवले गेले पाहिजे असे देखील पुप्पलवार म्हणाले. या बैठकीत शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार,यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा, शहर उपाध्यक्ष गणेश सिलगमवार, अफजल अली, महिला उपाध्यक्षा सलमा सिद्दीकी, चंद्रपुर महिला अध्यक्षा तबस्सुम शेख, युथ अध्यक्ष सागर कांबळे, रेखाताई भोगे, कु.मयूरी तोड़े तसेच वन्यजीवांच्या हल्ल्यानेग्रस्तांचे नातेवाईक देखील उपस्थित होते. ================================      *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ===========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here