मतदार यादी अद्ययावत करण्‍यासाठी शासनाने पुढाकार घ्‍यावा – राहूल पावडे

0
25

===========================

यासंदर्भात राहूल पावडे यांनी दिले जिल्‍हाधिकारी यांना निवेदन
==============================
गेल्‍या महिन्‍यात चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात लोकसभेची निवडणूक पार पडली. अनेक मतदार हे मतदान केंद्रावर गेल्‍यावर त्‍यांची नावे मतदार यादीत नसल्‍याचे त्‍यांना कळले ही अतिशय धक्‍कादायक बाब आहे. ज्‍यांची नावे गेल्‍या अनेक वर्षांपासून मतदार यादीत आहेत व जे निरंतर मतदार करीत आहेत अश्‍याही लोकांची नावे मतदार यादीतुन गायब झाली. त्‍यामुळे याप्रकाराची चौकशी करावी, असे निवेदन भाजपा चंद्रपूर जिल्‍हा महानगर अध्‍यक्ष राहूल पावडे यांनी जिल्‍हाधिका-यांना दिले. याप्रसंगी शहर महामंत्री रामपाल सिंह उपस्थित होते.
=============================
मतदार यादया लवकरात लवकर अद्ययावत कराव्‍या अशी मागणी यावेळी राहूल पावडे यांनी केली. यावेळी या विषयावर मा. जिल्‍हाधिका-यांशी विस्‍तृत चर्चा झाली. मा. जिल्‍हाधिका-यांनी यावेळी बोलताना सांगीतले की ४ जून नंतर यासंदर्भात सर्व बुथवर पुन्‍हा एकदा मतदार यादी अद्ययावत करण्‍यासाठी एक विशेष मोहीम राबविण्‍यात येईल. शासन जास्‍तीत जास्‍त मतदारांचे नांव मतदार यादीत यावे यासाठी नेहमी प्रयत्‍न करतात. शासन स्‍तरावर सर्वतोपरी प्रयत्‍न करण्‍याचे निर्देश अधिकारी व कर्मचा-यांना देणार असल्‍याची माहिती मा. जिल्‍हाधिका-यांनी यावेळी दिली.
==========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
============================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here