==========================
मुंबईत 13 मे 2024 विशाल होर्डीग्स कोसळले.,यात अनेकांची जीवित हानी झाली.अशी घटना चंद्रपूरात नाकारता येत नाही.म्हणून शहरातील सर्व होर्डिंग्जचे तात्काळ ऑडिट करावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूरने मनपा प्रशासनाकडे निवेदन देऊन केली आहे.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, रामपाल सिंग,महामंत्री प्रज्वलंत कडू,मंडळ प्रमुख संदीप आगलावे,रवी लोणकर,चांद सैय्यद, रवी चाहरे,रुद्रनारायण तिवारी,पुरुषोत्तम सहारे यांची उपस्थिती होती.
===============================
पावडे म्हणाले, चंद्रपूरमध्ये सुध्दा होर्डिंग्ज कोसळण्याच्या घटना होऊ शकतात.,म्हणून दक्षता घेणे गरजेचे आहे.
मुंबई येथील घडलेली दुर्घटना अत्यन्त दुखदायी आहे.प्रशासनाचा हलगर्जीपणा यास जवाबदार आहे.अनधिकृतपणे मुंबईत ते विशाल होर्डिंग लावण्यात आले.अशी स्थिती येथेही नाकारता येत नाही.करीता, शहरामध्ये ठिकठिकाणी लागलेल्या होर्डिंग्जचे सर्व्हे करून ऑडीट करण्यात यावे. अशी मागणी त्यांनी केली. ============================= *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =======================≠====
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,