*म्हाडा वसाहतीत सोयी सुविधा उपलब्ध करा – आ. किशोर जोरगेवार*

0
24

=============================      नागपूर येथील गृह निर्माण क्षेत्र विकास मुख्याधिकाऱ्यांशी बैठक घेत केल्या सूचना  ============================                 म्हाडा वसाहतीत अनेक समस्या असल्याच्या तक्रारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात प्राप्त झाल्या होत्या. दरम्यान आज आमदार किशोर जोरगेवार यांनी नागपूर येथील महाराष्ट्र गृह निर्माण व क्षेत्र विकास कार्यालय येथे मुख्याधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांशी  चर्चा करत म्हाडा वसाहतीत सोयी सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना केल्या आहे. यावेळी म्हाडा नागपूर चे मुख्याधिकारी महेश कुमार मेघमाळे, म्हाडा नागपूरचे कार्यकारी अभियंता श्रीमती दीप्ती काळे, म्हाडा चंद्रपूर च्या उपअभियंता श्रीमती मोनिका थोटे, म्हाडा चंद्रपूरच्या ADTP श्रीमती भाग्यश्री टाक, म्हाडा चंद्रपूरचे उपअभियंता (विद्युत)  चंद्रशेखर वानखेडे, यंग चांदा ब्रिगेडचे  करण नायर उपस्थित होते. =============================                 सन 2001 ते 2005 च्या दरम्यान म्हाडा ने नवीन चंद्रपूर येथे वसाहत निर्माण करणे सुरु केले. येथे डांबरी रस्ते व नालीचे बांधकाम करण्यात आले. दरम्यान म्हाडाची वसाहत निर्माण करण्याची गती वाढली असून 2023 रोजी म्हाडा अंतर्गत येथील घरांची संख्या 1300 पेक्षा अधिक झाली आहे. येथे जवळपास 7 हजार लोकसंख्या आहे. त्यामुळे येथील वाढती लोकसंख्या लक्षात घेता येथे अद्यावत सोयी सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. येथील रस्त्यांची दुरावस्था झाली असून याबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हाडाच्या अधिका-यांना सांगीतले आहे. ============================                   या परिसरात विद्युत खांब व पथदिवे नसून मुख्य रस्ते डांबरीकरण नाही. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेता म्हाडा वसाहत दाताळा येथील नागरिकांच्या अडचणींचा गांभिर्यपूर्वक विचार करुन सदर वसाहत अंतर्गत सिमेंट काॅंक्रिट रोडचे बांधकाम, विद्युत खांब लावण्याचे काम तातळीने पूर्ण करत येथे सोयी सुविधा उपलब्ध करण्यात यावा अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हाडाच्या संबंधित अधिका-यांना केल्या आहे.                ============================               *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================          संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,p

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here