शहरातील दुस-या अम्मा की दुकानाचे अम्माच्या हस्ते उद्घाटन

0
31

==========================

निराधार महिलांच्या सक्षमीकरणासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचा उपक्रम,
============================
*चंद्रपूर*             ==========================                निराधार महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून स्व. प्रभाताई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अम्मा कि दुकान उपक्रम राबविल्या जात असून सदर उपक्रमा अंतर्गत जलनगर येथील प्रिती मसराम या महिलेला दुकान उपलब्ध करुन देण्यात आले आहे. ==========================                 गगुबाई उर्फ अम्मा यांच्या हस्ते सदर अम्मा कि दुकानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, आशा देशमुख, निलिमा वनकर, युवती प्रमूख भाग्यश्री हांडे, रुबीना शेख, वनिता गाताडे, संगीता धुर्वे, चंद्रशेखर देशमुख, सतनाम सिंह मिरधा, अनिल गाताडे आदींची उपस्थिती. =============================          आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून अम्मा का टिफिन हा उपक्रम राबविल्या जात आहे. सदर उपक्रमाअंतर्गत निराधार गरजुंना दररोज जेवणाचा टिफिन पोहोचविले जात आहे. हा उपक्रम चालवत असतांना अनेक निराधार महिलांमध्ये व्यवसाय करण्याची जिद्द आहे. मात्र भांडवल नसल्याने त्यांना अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर अम्मा कि दुकान हा उपक्रम सुरु करण्याचा निर्धार आमदार किशोर जोरगेवार यांनी केला होता. या उपक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील दिव्यांग बांधवांना स्वयंरोजगारासाठी अम्मा कि दुकान देण्यात आली आहे. तर शहरात निराधार महिलांना सदर दुकान दिल्या जात आहे. ==============================                या अगोदर सदर उपक्रमाअंतर्गत बंगाली कॅम्प येथील मालती देवनाथ या निराधार महिलेला अम्मा का दुकान उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तर आज शहरातील दुस-या अम्मा कि दुकानचे उद्घाटन अम्माच्या हस्ते करण्यात आले आहे. प्रिती मसराम या महिलेला हे दुकान देण्यात आले असून जलनगर परिसरात हे दुकान सुरु करण्यात आले आहे. ===========================                आपण दुकान उपलब्ध करुन देत आहोत. आता प्रामाणिक पणे कष्ट करुन यातुन आर्थिक उत्पन्न मिळवा, मी सुध्दा आजही टोपल्या विकते. मेहनतीने मिळविलेल्या कमाईचा आनंद अधिक आहे. हिच खरी श्रीमंती आहे. या दुकानाच्या माध्यमातून आणखी एक दोन जनांना आपण रोजगार द्यावा. सुखी संसार करावा असे यावेळी अम्मा म्हणाल्या. ============================               *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*. =============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here