*ओबीसीतील घुसखोरी खपवून घेणार नाही : विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे*

0
20

=============================

*धर्मानुसार आरक्षणाला ओबीसी संघटनांचा विरोध*

=================================

          *चंद्रपूर*

===========================

वारंवार ओबीसी संवर्गातून इतर सधन जाती आरक्षण मागत आहेत. देशातील विविध राज्यात राज्य सरकार मतांचे राजकारण करण्यासाठी धर्माच्या आधारावर सधन जातींना घटनाबाह्यरीत्या ओबीसीत सामावून घेत आहेत. हा खूप मोठा घोटाळा आहे. महाराष्ट्रात मराठा समाज ओबीसीतून आरक्षण मागत आहे. पं. बंगाल, कर्नाटक व इतर राज्यात धर्मानुसार आरक्षण दिल्या जात आहे. ओबीसीतील ही अवैध घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही, ओबीसीतून आरक्षण देताना त्या जातीचे मागासलेपण तपासून बघितले पाहिजे, असे विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यावेळी संवाद कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलले.

————————————–

*राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग मागासवर्गीयांच्या हक्क व अधिकारांचे संरक्षण करेल : राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर*

=========================

*संवाद कार्यक्रम संपन्न*

==========================

*ओबीसींचा एल्गार; राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या पाठीशी*

===========================

       *चंद्रपूर* 

===========================

यापुढे ओबीसी आरक्षणाबाबत कोणतेही घोटाळे होणार नाही. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा प्रभाव व दबाव आता वाढलेला आहे. आयोग ओबीसीबाबत होणाऱ्या सर्व घोटाळ्यावर अंकुश ठेवून आहे. तसे अहवाल तयार करण्यात येत आहेत. शाळा प्रवेश, शिष्यवृत्ती पासून तर नोकर भरती इथपर्यंत आता आयोग लक्ष ठेवून आहे. काही राज्यात होणारे घोटाळे आयोगाने उघडकीस आणले आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग मागासवर्गीयांच्या हक्क व अधिकारांचे संरक्षण करेल, अशी ग्वाही भारत सरकारच्या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी यावेळी आयोजित संवाद कार्यक्रमात दिली.

==========================

पं. बंगाल, कर्नाटक व इतर राज्यांनी ओबीसी आरक्षणात केलेले घोटाळे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून उघड झाले आहे. त्यासंबंधी ओबीसी संघटनांसोबत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांचा ओबीसी संवाद कार्यक्रम आज (दि.१) ला स्थानिक जनता महाविद्यालयाच्या सेमिनार हॉल मधे पार पडला. यावेळी अध्यक्ष स्थानी डॉ. अशोक जीवतोडे उपस्थित होते.

==========================

मंचावर प्रमुख अतिथी स्वरूपात ओबीसी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते बबनराव फंड, बबनराव वानखेडे, ज्येष्ठ विधीज्ञ पुरुषोत्तम सातपुते, माजी आमदार ऍड. संजय धोटे, सामाजिक कार्यकर्ते रमेश राजूरकर, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन कुकडे, ओबीसी मोर्चाचे विनोद शेरकी आदी उपस्थित होते.

============================

या ओबीसी संवाद कार्यक्रमात पूर्व विदर्भातून ओबीसीतील विविध जात समुदायातील पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

============================

संवाद कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्नोत्तरे घेण्यात आली. उपस्थित ओबीसी बांधवांनी हंसराज अहिर यांना प्रश्न विचारली, त्या प्रश्नांची यथोचीत उत्तरे देण्याचा प्रयत्न केल्या गेला. या निमित्ताने काही जात संघटनांनी आयोगाच्या अध्यक्षांना निवेदन दिले.

==========================

कार्यक्रमाला किसनराव गरपल्लीवार, जयजगन्नाथ जंपलवार, विजुभाऊ मुंगले, भुजंग ढोले, राजू बोलमवार, राहुल देवतळे,  वंदना संतोषवार, मुग्धा खांडे, अरुणा चौधरी, सारिका संदुरकर, वासमवार, जनार्दन थेटे, अमोल चवरे, रामकृष्ण मंदावार, अशोक रामगिरवार, विवेक कुटेमाटे, केशव थीपे, शंकर काळे, किशोर मोगरे, निकीलेश चामरे, सुरेश धांडे, शिवदास शेंडे, आयुष वासेकर, प्रेमलाल पारधी, अरुण मालेकर, अरुण देऊलकर, नितीन सोनपितरे, देवराव सोनपितरे, चेतन शेंडे, मधुकर घाटे, एन.बी. सूर, आर.एम. शिखरे, टी.एस. भोयर, रमेश बोबडे, चंद्रशेखर बोबडे, निर्मला हेलवटे, एस.पी. सातपुते, एस. व्ही. मोहितकर, एस. व्ही. अडबाले, पी.बी. जांभूळकर, एस.बी. ठावरी, पी.एम. उरकुडे, एम. एल. पानघाटे, डी.एल. कुबडे, एस.एन. टोंगे, एस. डी. गौरकर, पी. डी. आगलावे, आर.एन. ढोके, डी.एम. बोढे, पी. डब्लू. जेनेकर, पी.बी. भोंगळे, पी.एस. पानघाटे, भास्कर जीवतोडे, बंडू लांडे, विठोबा पोले, अमरसिंग बघेल, नरेंद्र धांडे, पिपरे, ताजने, जोगी आदी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. =============================    कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा. रविकांत वरारकर यांनी केले. ===============================         *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ==============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here