===========================
*चंद्रपूर*
==============================
इंडियन रेडक्रॉस सोसायटी, आय.एम.ए. व चंद्रपूर कॅन्सर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने टाटा कॅन्सर हॉस्पिटल चंद्रपूर येथे जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या अनुषंगाने जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले,या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे सचिव व आय.एम.ए.चे माजी अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या विविध कॅन्सरची माहिती जन समुदायला दिली, तसेच तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामाच्या माहिती सोबतच या वर्षीचे ब्रीद वाक्याच्या अनुषंगाने तंबाखूच्या जाहिरातीमुळे तरुण मुला-मुलींवर होणाऱ्या आघातामुळे चिंता व्यक्त केली.
डॉ. कल्पना गुलवाडे (माजी सचिव आई. एम. ए.)प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना उष्णतेच्या तीव्र लाटेपासून बचाव करण्यासंबंधीच्या घेण्यात येणाऱ्या उपाय योजनेबद्दल माहिती दिली. डॉ. बी.एच. दाभेरे यांनी तंबाखू सेवन न करण्यासाठीची प्रतिज्ञा जन समाजाकडून वदवून घेतली. ============================= *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,























