=============================
*चंद्रपूर*
=============================
येथील भारतीय जनता पार्टी तर्फे रविवार 7 जुलैला जनतेला राज्याचा अर्थसंकल्प कळावा म्हणून ‘अर्थ संकल्पाचे विश्लेषण’ या कार्यक्रमाचे आयोजन प्रियदर्शिनी सभागृहात रविवार 7 जुलैला सायंकाळी 7 वाजता करण्यात आले आहे.
राज्याचे वने,मत्स्यपालन व्यवसाय व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्या ओजस्वी वाणीतून अर्थसंकल्पाचे विस्तृत विश्लेषण करणार आहेत अशी माहिती महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र हा देशात नेहमी आर्थिक क्षेत्रात प्रथम क्रमांकावर राहिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी मांडलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पातून शेवटच्या व्यक्तीपर्यंत मदतीचा आधार देणाऱ्या योजना प्रस्तावित केल्या आहेत.हेच नाहीतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेचं राज्य व कल्याणकारी संकल्पना साकार करणारा हा अर्थसंकल्प आहे.तरी देखील यावर विरोधकांनी टीकास्त्र सोडले.ना.अजित पवार यांनी विधिमंडळात मांडलेला अर्थसंकल्प लोकाभिमुख आणि कल्याणकारी असून राज्यातील विकासकामे व विविध योजना पुढे घेऊन जाणारा आहे.त्यामुळे जनतेला सत्य कळावे म्हणून माजी अर्थमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार या अर्थसंकल्पाचे विश्लेषण करणार आहेत असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी चंद्रपूर तर्फे करण्यात आले आहे. ============================= *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा. ==============================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,