*” मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ” या योजनेच्या मदत कार्यालयाचे शुभारंभ मा.खा. अशोक जी नेते यांच्या शुभहस्ते गडचिरोली येथे संपन्न*

0
14

=============================

*लाडकी बहीण’ योजनेचा सर्वाधिक महिलांनी लाभ घ्यावा*
*मा.खा.अशोकजी नेते यांचे आवाहन*

===========================

दि.०५ जुलै २०२४

===========================

गडचिरोली :- नुकतेच महाराष्ट्र राज्यातील सरकारने महिलांचा सन्मान करण्याच्या दृष्टिकोनातून  महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली असून या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना मिळावा यासाठी  गडचिरोली येथे महिलांच्या मदती करिता किंवा कागदपत्राच्या मदत करिता महिला भगिनीं ना धावपळ होऊन त्रास होऊ नये याकरिता  माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते चामोर्शी रोड, जनसंपर्क कार्यालय गडचिरोली येथे मदत कार्यालयाचे आज दि.०५ जुलै २४ रोजी शुक्रवारी उद्घाटन करून शुभारंभ करण्यात आले. ==============================            याचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घेण्याचे आवाहन माजी खासदार  अशोकजी नेते यांनी केले आहे. =============================                  या योजनेत २१ ते ६५ वर्षे वयाच्या महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. यासाठी शासन दरवर्षी ४६ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहे. तरी लाभास पात्र असणाऱ्या महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘माझी लाडकी बहीण योजने’चे फॉर्म भरावे. फार्म भरताना महिलांची आर्थिक पिळवणूक होणार नाही याची दक्षता संबंधितांनी घ्यावी. राज्य  सरकारच्या माध्यमातून युवा, शेतकरी, दुर्बल-महिला अशा विविध घटकांना विविध योजनांच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम करण्यात येत आहे. त्याचा प्रचार व प्रसार वेगाने करण्याच्या सूचनांही यावेळी माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते यांनी यावेळी उद्घाटन शुभारंभ प्रसंगी केले. =============================          याप्रसंगी मा.खा.अशोकजी नेते यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थी  महिला भगिनींचा फार्म स्वतः भरून कामाचा शुभारंभ केला. =============================            यावेळी प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे,जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारत खटी, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, जिल्हा सचिव वर्षाताई सेडमाके, जिल्हा सचिव रंजीताताई कोडाप, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे,जिल्हा उपाध्यक्ष अनिल कुघाडकर,कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुधाकरजी पेटकर, शहर महामंत्री विनोद देवोजवार,शिवसेनेच्या जिल्हा संपर्क प्रमुख वर्षाताई मोरे,शहर महामंत्री पल्लवी बारापात्रे, अविनाश विश्रोजवार, शामभाऊ  वाढई,श्रीकांत पतरंगे,  देविदास नागरे ,अरुण नैताम, पत्रकार संजय टिपाले, राजू सहारे, कैलास शर्मा, प्रल्हाद  मशाखेत्री, राकेश राचमलवार, तसेच मोठया संख्येने फार्म भरण्यासाठी आलेल्या लाभार्थी महिला भगिनीं  उपस्थित होते.   ==============================          *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here