एकही नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित राहणार नाही

0
41

============================

एकही नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित राहणार नाही
ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली ग्वाही =============================         उथळपेठ येथे वाचनालयाच्या इमारतीचे लोकार्पण ===============================        चंद्रपूर, दि.०८- नागरिकांना चांगले रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण या सर्व सुविधा पुरविण्याची जबाबदारी स्थानिक यंत्रणा म्हणून ग्रामपंचायतीची असते. मात्र या सुविधा अधिक दर्जेदार करून नागरिकांच्या जीवनात सुलभता आणण्यासाठी सरकारचे सहकार्य सर्वतोपरी असते. त्यातूनच पुढे अनेक कल्याणकारी योजना पुढे येतात. विद्यार्थी, नागरिकांच्या बौद्धिक विकासासाठी वाचनालयाची निर्मिती हा महत्वपूर्ण पुढाकार आहे. उथळपेठ गावात अशा अनेक दर्जेदार सुविधा प्रदान करताना कुणीही नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय, तथा चंद्रपूरचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. ===============================         जिल्हा खनिज प्रतिष्ठान, चंद्रपूर अंतर्गत मुल तालुक्यातील उथळपेठ येथे वाचनालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले. या इमारतीचे ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी उथळपेठचे सरपंच पलिंन्द्र सातपुते, उपसरपंच भारतीताई पिंपळे,नंदकिशोर रणदिवे, वर्षाताई लोनबाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, उपकार्यकारी अभियंता प्रशांत वसुले, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, तहसीलदार श्रीमती मृदुलाताई मोरे, सहायक अभियंता राठोड, पोलीस पाटील भाग्यश्री चिचघरे यांच्यासह ग्रामपंचायतचे सर्व सदस्य उपस्थित होते. ==============================               ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून उथळपेठमध्ये वाचनालयाच्या इमारतीसाठी २ कोटी ५० लक्ष रुपये निधी खर्चून वाचनालयाची इमारत बांधण्यात आली . गावातील वाचनालयाची इमारत भव्य आणि अत्याधुनिक सुसज्ज असल्याचे सांगत त्यां ==============================           *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ==============================       कार्यकारी संपादक शशिकांत मोकासे 

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here