==============================
आमदार किशोर जोरगेवार यांचे घुग्घूस नगर परिषद अधिकाऱ्यांना निर्देश, स्वच्छता कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन होणार अदा
================================= घुग्घूस नगर परिषदेच्या वतीने राबविण्यात आलेल्या अतिक्रमण विरोधी मोहिमेत अनेकांची दुकाने हटविण्यात आली आहे. या सर्व छोट्या व्यावसायिकांसाठी जागा आरक्षित करून उद्या मंगळवारपर्यंत त्याना सदर जागा व्यवसायासाठी उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी घुग्घूस नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जितेंद्र गादेवार यांना दिले आहेत. सोबतच सफाई कामगारांचे थकीत असलेले वेतन तात्काळ अदा करण्याच्या सूचनाही आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहेत. ================================= त्यानुसार उद्या मंगळवारी 52 व्यवसायिकांना जागा उपलब्ध करून देण्यात येणार असून सफाई कामगारांचे वेतनही उद्या मंगळवारी अदा केले जाणार आहे. आज सोमवारी घुग्घूस येथील विविध विषयांच्या अनुषंगाने आमदार किशोर जोरगेवार यांनी घुग्घूस नगर परिषद येथे बैठक बोलावली होती. या बैठकीत बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर सूचना केल्या आहेत. या बैठकीला घुग्घूस नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र गादेवार, कार्यालयीन अधिक्षक निलेश तुरानकर, नगर अभियंता मनीष जुनघरे, लेखपाल विक्रम क्षीरसागर, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग अभियंता सोनाली नागरगोजे, यंग चांदा ब्रिगेडचे घुग्घूस नेते इमरान खान, प्रेम गंगाधरे, स्वप्निल वाढई, मयूर कलवल, रमन टांड्रा, शाहरुख शेख, वैभव क्षीरसागर, सुरज मोपाका, विशाल दामीर, बहुजन महिला आघाडी घुग्घूस प्रमुख उषा आगदारी, आदिवासी महिला प्रमुख उज्वला उईके, महिला कामगार संघटिका वनिता निहाल, शारदा पोन्नारा, भारती सोदारी, सुरेखा तोडासे, अनिता गोवर्धन आदींची उपस्थिती होती. ================================= घुग्घूस ग्रामपंचायतीचे रूपांतर आपण नगरपरिषदेत केले आहे. त्यामुळे नगर परिषद दर्जाच्या सोयीसुविधा येथील नागरिकांना मिळणे अपेक्षित आहे. येथे नियमित स्वच्छता होत नसल्याच्या तक्रारी आहेत. या दृष्टीने विशेष लक्ष द्या, नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्या, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सुरु करून सोयीसुविधा उपलब्ध करा, पूर परिस्थिती बाबत योग्य त्या उपाययोजना करा, आदी सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी घुग्घूस नगर परिषद प्रशासनाला केल्या आहेत. सोबतच घुग्घूस नगर परिषदेच्या वतीने राबविण्यात आलेल्या अतिक्रमण विरोधी मोहिमेत अनेक छोट्या व्यवसायिकांचे दुकाने हटविण्यात आली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर मोठे संकट आले आहे. ही बाब लक्षात घेता या सर्व दुकान व्यवसायिकांना दुकाने लावण्यासाठी जागा निश्चित करून देत उद्या मंगळवारी त्यांना सदर जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश सदर बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले आहेत. येथे काम करत असलेल्या सफाई कामगारांचे वेतन तीन महिन्यांपासून थकीत ठेवले गेले आहे. ही योग्य बाब नाही. घुग्घूस शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करत असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे वेतन तात्काळ अदा करण्याचे निर्देशही या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले आहेत. ================================= *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ================================ कार्यकारी संपादक शशिकांत मोकासे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,