Home
Home चंद्रपूर *NEET परीक्षेत झालेल्या घोटाळ्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टी रस्त्यावर*

*NEET परीक्षेत झालेल्या घोटाळ्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टी रस्त्यावर*

0
186

===============================

राजुरा : देशात उघडकिस आलेल्या NEET परीक्षेत झालेल्या घोटाळ्यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मुख्य मागणीसह बहुजन मुक्ती पार्टी रस्त्यावर उतरूण चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल (दि. १२) धरणे आंदोलन करीत मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.          ==============================        मेडिकल प्रवेशाकरीता देशपातळीवर घेण्यात आलेल्या NEET परिक्षेत विविध प्रकारचा घोटाळा झाला आहे. यात पेपर लिक होणे, ग्रेस मार्क च्या नावावर निवडक विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देणे अशा प्रकारच्या गोष्टीसमोर आल्या असून यात बिहार राज्यातील पटना येथील १३ संशयीतांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. या घोटाळ्यात सहभागी दोषींवर कडक कारवाई करण्याच्या मुख्य मागणी सह परिक्षा शासकीय प्रशासनाच्या माध्यमातून घेणे, दुसऱ्यांदा परिक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांकडून परीक्षा फी न घेणे, ज्या विद्यार्थ्यांनी घोळ केला त्यांच्यावर कारवाई करणे व त्यांना परीक्षेत बसू देण्यास प्रतिबंध लावणे अशा विविध मागण्या घेऊन बहुजन मुक्ती पार्टी चंद्रपूर च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. ===============================      यावेळी, बहुजन मुक्ती पार्टी चंद्रपूरजिल्हा अध्यक्ष प्रविण कुमरे, आयटक जिल्हाध्यक्ष रविंद्र उमाटे, वरोरा विधानसभा प्रभारी नितेश सिडाम, प्रदेश अध्यक्ष धर्मेंद्र मेश्राम, चिमूर विधानसभा अध्यक्ष योगेश गेडाम, प्रमोव पॅवाम, वसंत दडमल, विशाल भसारकर, प्रमोद सोनवने, आनंवा गावंडे, रचना गेडाम, कवडू पिंपळकर, जगजीवन कांबळे सह सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. ==============================          *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ==============================                   कार्यकारी संपादक शशिकांत मोकासे                                  संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here