103 सुरक्षा रक्षकांना कामावर घेण्याचा मार्ग मोकळा, भरती प्रक्रियेत प्राधान्य देण्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे निर्देश

0
28

===============================             103 सुरक्षा रक्षकांना कामावर घेण्याचा मार्ग मोकळा, भरती प्रक्रियेत प्राधान्य देण्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे निर्देश                                                                    =============================== आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नानंतर मुंबई येथे कामगारांसह कामगार मंत्री यांची बैठक ================================= आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नानंतर सीएसटीपीएस येथील 103 सुरक्षा रक्षकांना कामावर घेण्याचा मार्ग मोकळा झाला असून महानिर्मितीमध्ये होणार असलेल्या भरती प्रक्रियेत सदर सुरक्षा रक्षकांना प्राधान्य देत त्यांची सरळ भरती करण्यात यावी असे निर्देश कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिले आहेत. आज सदर विषयाच्या अनुषंगाने आमदार किशोर जोरगेवार यांनी कामगार मंत्री यांच्यासह मुंबई मंत्रालयात सुरक्षारक्षकांची बैठक घडवून आणली होती. या बैठकीत मंत्री सुरेश खाडे यांनी सदर निर्देश दिले आहेत. ============================                    या बैठकीला आमदार किशोर जोरगेवार, प्रधान सचिव विनिता वेद-सिंगल, कामगार आयुक्त- एच. पी. तुंबोड, माथाडी सह आयुक्त शिरीन लोखंडे, उपसचिव स्वप्नील कापडणीस, अवर सचिव दिलीप वनिरे, चंद्रपूर सहायक  कामगार आयुक्त मा. पे मडावी, चंद्रपूर सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाचे अधिकारी, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन सुरक्षा रक्षक कामगार समिती अध्यक्ष राजेश गायकवाड, सचिव बापूसाहेब जावळे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष समीर पठाण यांच्या सह सुरक्षा रक्षकांची उपस्थिती होती. ============================               2015 मध्ये चंद्रपूर-गडचिरोली जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ येथे 103 सुरक्षा रक्षकांची नोंदणी करण्यात आली होती.  मात्र सदर नोंदणी अवैध असल्याचे सुरक्षा रक्षकांना सांगण्यात आले. त्यानंतर 2016 मध्ये संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि 103 सुरक्षा रक्षक यांच्यामध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीत नोंदित 103 सुरक्षा रक्षकांची नोंदणी वैध ठरविण्यात आली. ================================  त्यानंतर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्या कडून मैदानी आणि शारीरिक चाचणी घेण्याचे ठरविण्यात आले. परंतु, तांत्रिक कारणांमुळे चाचणी पुढे ढकलण्यात आली. पुढील चाचणीकरिता तारीख लवकर देण्यात येईल असे संबंधित विभागाकडून सुरक्षा रक्षकांना कळविण्यात आले, मात्र अद्यापही आदेश काढण्यात आलेला नाही. त्यामुळे एवढे वर्ष उलटूनही 103 सुरक्षा रक्षकांची शारीरिक व मैदानी चाचणी झालेली नाही. आता सदर सुरक्षा रक्षक बेरोजगार झालेले असून त्यांच्या कुटुंबावर उपसामारीची वेळ आली आहे.    ================================= आमदार किशोर जोरगेवार यांनी याचा गांभीर्याने विचार करून सदर सुरक्षा रक्षकांना कामावर घेण्याची मागणी केली होती. मागणीच्या पूर्ततेसाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अखेर, आज मुंबई येथील मंत्रालयात कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. यावेळी महानिर्मितीला 250 सुरक्षा रक्षकांची गरज आहे. या भरती प्रक्रिये दरम्यान नोंदणीकृत 103 सुरक्षा रक्षकांना प्राधान्य देत त्यांना सरळ सेवेत घेण्यात यावे असे निर्देश कामगार मंत्री यांनी दिले आहेत. ================================      तसेच, सदर सुरक्षा रक्षकांचा जमा असलेला टीडीएस देण्यात यावा, सुरक्षा रक्षकांना ईएसआय लागू करण्यात यावा अशी मागणीही या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. याबाबतही सकारात्मक भूमिका घेत सदर सुरक्षा रक्षकांचा टीडीएस देण्यात यावा व ईएसआय लागू करण्याचे निर्देशही मंत्री सुरेश खाडे यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. त्यामुळे या 103 सुरक्षा रक्षकांची आठ वर्षांची प्रतीक्षा संपली असून ते लवकरच कामावर रुजू होणार आहेत. याबद्दल सुरक्षा रक्षकांनी आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार मानले आहे.     ==================================        *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*    =================================             कार्यकारी संपादक शशिकांत मोकासे                                  संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here