Home
Home प्रशासकीय *जिल्हा परिषदेकडून पेसा क्षेत्रातील आदिवासी तरुणाची अवहेलना…*

*जिल्हा परिषदेकडून पेसा क्षेत्रातील आदिवासी तरुणाची अवहेलना…*

0
128

================================         

*जिल्हा परिषदेकडून पेसा क्षेत्रातील आदिवासी तरुणाची अवहेलना…*                  ================================ सेवानिवृत्त शिक्षकांनाच पुन्हा संधी    ============================== बेरोजगारांना रोजगारापासून वंचित ठेवण्याचा कट   ==============================

सास्ती: जिल्ह्यातील पेसा अंतर्गत येत असलेल्या गावातील जिल्हा परिषद शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षक पदाकरिता
सेवानिवृत्त शिक्षकांना पुन्हा मानधनावर निवडी करीता  जिल्हा परिषदेने अर्ज मागविले असून हा  पात्र आदिवासी युवकांवर अन्याय असल्याचा आरोप करीत त्यांना बेरोजगार ठेवण्याचा कट खपवून घेतला जाणार नाही असा इशारा बहुजन मुक्ती पार्टी चे जिल्हा अध्यक्ष प्रवीण कुंमरे यांनी दिला आहे.
चंद्रपूर जिल्ह्याअंतर्गत राजुरा विधानसभेतील कोरपना जिवती राजुरा या तालुक्यातील काही गावे पेसा अंतर्गत येतात त्या आदिवासीबहुल क्षेत्रातील काही ठिकाणातील आदिवासी युवा तरुण पात्रता धारक असतानाही व आयुष्याच्या उंबरठ्यावर नोकरीची अपेक्षा करत असताना या आदिवासी क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळेच्या रिक्त पदावर सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांमधून भरती करण्यासंदर्भात जिल्हा परिषदेने दिनांक 21 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज मागविलेले आहे या धोरणाचा राजुरा विधानसभेतील सर्व युवा तरुण बेरोजगार यांनी तीव्र नाराजी दर्शवून  निषेध नोंदविलेला आहे जर अशा प्रकारे युवा तरुण बेरोजगारावर अन्याय होत असल्यास शासनाविरोधात आवाज उठवण्याची व युवा तरुण बेरोजगारांना योग्य न्याय देण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टी अध्यक्ष प्रवीण कुंमरे हे येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडणार आहे करिता याची दखल संबंधित विभागाने घेऊन तसेच शासनाने या तरुण युवा शिक्षित बेरोजगार तरुणांना न्याय देण्याचे करावे अशी मागणी केली जात आहे. =================================              *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*    =================================            कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here