==================================
मेळावा संपताच दोन गटात हाणामारी! ============================== चंद्रपूर(का.प्र.): आज दिनांक 22/08/ 2024 रोजी 18/45 वाजता राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख व सोबत अमित ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना युवा सेना अध्यक्ष, एन.डी. हॉटेल येथे पदाधिकारी/कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. =============================== हा मेळावा मनदीप रोडे मनसे जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात घेण्यात आला असून सदर कार्यक्रमात मनोज तांबेकर, रोजगार सेना रोजगार जिल्हाध्यक्ष मनसे , प्रकाश नागरकर पडोली तालुका अध्यक्ष मनसे , राहुल बालमवार जिल्हाध्यक्ष मनसे, वर्षाताई बोंबले शहराध्यक्ष महिला शहर अध्यक्ष, महेश शास्त्रकार व्यापारी सेना मनसे, सचिन भोयर माजी नगरसेवक शहराध्यक्ष मनसे, राजू कुकडे उपाध्यक्ष मनसे , आनंद बावणे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष मनसे, महेश वासलवार वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष मनसे, सह बहुसंख्येने मनसे कार्यकर्ते उपस्थित होते,

कार्यकर्ता मेळाव्यात
योग्य पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला होता. योग्य पोलीस बंदोबस्त नेमण्यात आल्याने कोणतीही अप्रिय घटना घडली नाही.
जर या ठिकाणी योग्य पोलीस बंदोबस्त नसता तर पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यानंतर झालेल्या राड्यात काय झाले असते हे म्हणणे अवघड आहे, हे मात्र विशेष!
7 वाजता पर्यंत या मेळाव्यातील कार्यकर्ताना राज ठाकरे यांनी संबोधन केले. व या मेळाव्यातच राज ठाकरे यांनी मनदीप रोडे राहणार महेश नगर चंद्रपूर यांना चंद्रपूर विधानसभेचें आमदार करीता तसेच सचिन भोयर यांना राजुरा विधानसभा चे पक्षाचे उमेदवार म्हणून उमेदवारी निश्चित करण्यात आल्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली.
राज ठाकरे यांनी पदाधिकारी,
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत प्रचारासाठी कामाला लागावे असे ही या मेळाव्यात जाहीर केले.
*उमेदवारवारीच्या घोषणेमुळे मेळावा संपताच दोन गटात हाणामारी.*

चंद्रपूर चे माजी नगरसेवक सचिन भोयर यांना राजुरा विधानसभेची उमेदवारी राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख यांनी चंद्रपूर येथील एनडी हॉटेल मध्ये घेण्यात आलेल्या पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यात जाहीर केल्याने त्या भागात काम करत असलेले प्रकाश बोरकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सचिव यांचे नाव राजुरा विधानसभेकरिता उमेदवार म्हणून जाहीर न केल्याने त्याबाबत संतप्त प्रतिक्रिया बोरकर यांनी व्यक्त केली. त्या परिसरातील त्या भागातील गावातील मनसे कार्यकर्ते यांनी सचिन भोयर यांना राजुरा विधानसभेची उमेदवारी जाहीर केल्याने आक्रोश व्यक्त केला व त्याबाबत त्वरित आपला पदाच्या राजीनामा देत असल्याबाबतची माहिती पत्रकारांना दिली. प्रेस नोट तयार करून पाठवण्यात येणार असल्याचे ही बोरकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
सचिन भोयर गट व बोरकर गट या दोन्ही गटांमध्ये राजुरा विधानसभा ची उमेदवारी घोषित करण्यात आल्याने हाणामारी झाली.
पोलिसांनी योग्य वेळेवर हस्तक्षेप करून ही हाणामारी थांबविली नसती तर काय झाले असते हे सांगणे अवघड आहे.
माजी नगरसेवक सचिन भोयर यांना राजुरा विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सचिन भोयर यांना शुभेच्छाही दिल्या आहे एवढेच नव्हे तर सचिन भोयर हे मागील अनेक दिवसापासून राजुरा विधानसभा क्षेत्रातील अनेक गावात जाऊन कार्यकर्त्यांशी व जनतेशी संपर्क साधत आहे, हे मात्र विशेष! ================================ *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================== कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,























