================================
*तान्हा पोळा निमित्त नंदीबैल सजावट व वेशभूषा स्पर्धा कार्यक्रम संपन्न – समाजसेवक राहूल देवतळे*
श्री विठ्ठल मंदिर वार्ड येथील विठ्ठल मंदिर स्टेडियम येथे मोठ्या उत्साहाने तान्हा पोळा निमित्याऊचने नंदीबैल सजावट व वेशभूषा स्पर्धेचे आयोजन समाजसेवक राहूल देवतळे यांच्या तर्फे करण्यात आले. याप्रसंगी प्रभागातील अनेक चिमुकले व बालगोपालांनी विविध प्रकारची सजावट व कोणी शेतकरी, डॉक्टर, महापुरुष अशा अनेक रुपात वेशभूषा स्पेर्धेमध्ये सहभाग घेतला. शेतकऱ्याचा साथी म्हणून बैलाला महत्त्व आहे व तो जगासाठी एक विधाताच आहे, याचे महत्त्व या बालगोपालांना समजावे व भविष्यात त्यांचा उत्साह वाढेल यादृष्टीकोनातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी नंदीबैल उत्कृष्ट सजावट प्रथम पुरस्कार रा.काँ.पा. च्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. बेबीताई उईके यांच्यातर्फे रेंजर सायकल व द्वितीय पुरस्कार रा.काँ.पा. चे शहर अध्यक्ष मा. दिपकबाबू जयस्वाल यांच्यातर्फे रु. 2101/- व उत्कृष्ट वेशभूषा साठी प्रथम पुरस्कार सामाजिक कार्यकर्ता श्री. लालाभाऊ गर्गेलवार यांच्यातर्फे रु. 3101/- व द्वितीय पुरस्कार रा.काँ.पा. चे शहर महासचिव सुहास पिंगे व विनायक वानखेडे यांच्याकडून रु. 2101/- देण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे आयोजक राहूल देवतळे यांच्याकडून स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व बालगोपालांना आकर्षक बक्षिसे व स्मृतिचिन्ह देण्यात आले.
याप्रसंगी उद्घाटक म्हणून सामाजिक कार्यकर्ता श्री. भानेश मातंगी व अध्यक्ष म्हणून जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. बिंदूबाबू बडकेलवार व मुख्य अतिथी श्री. विठ्ठल व्यायाम शाळेचे अध्यक्ष श्री. धन्नाभाऊ येरेवार, प्रमुख उपस्थितीत अरुणभाऊ गर्गेलवार, संजूभाऊ जिझीलवार, अनिल दळणे, प्रा. अनिल गर्गेलवार, दिपक पडगेलवार, मधुकर श्रीरामे, सुधाकर गर्गेलवार, वसंता पवार, विजय तुर्क्याल, अभय राऊत, विकास राऊत, अजय निंबाळकर, विजय बोरकुटे, अशोक घुमडे, गुड्डूभाऊ गर्गेलवार व मित्रपरिवार या सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
=================================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ================================== कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,