=================================
ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे गौरवोद्गार
विश्व ब्राह्मण पांचाळ समाज समितीचा गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा
चंद्रपूर,दि.०२ – विश्व ब्राह्मण पांचाळ समाजाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सोन्याशी संबंधित आहे. सोन्याचे काम करता करता या समाजाचे हृदयसुद्धा सोन्याचे झाले आहे, असे गौरवोद्गार राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आज (रविवारी) काढले. विश्व ब्राह्मण पांचाळ समाज समितीतर्फे गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. 
व्यासपीठावर अतुलराव कालेश्वरवार, रत्नाकर बोगोजवार, भाजपाचे महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, जिल्हा कोषाध्यक्ष मनोज सिंघवी, माजी जि. प. अध्यक्ष सुधाकरराव कुंदोजवार, नागाचारी मंदिर ट्रस्ट समितीचे अध्यक्ष विवेक आंबोजवार, विश्व ब्राह्मण पांचाळ समाज समिती चंद्रपूरचे अध्यक्ष सुधाकरराव श्रीपुरवार, उपाध्यक्ष गिरीश कंठीवार, रवींद्र मूलकलवार, सचिव बंडूजी देवोजवार, कोषाध्यक्ष विठ्ठलराव मुडपल्लीवार, सहकोषाध्यक्ष प्रा. अनुज कनोजवार, महिला समितीच्या अध्यक्षा प्रतिभाताई वंगलवार, युवक समिती अध्यक्ष सुहास वरपल्लीवार यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य, संपूर्ण जिल्ह्यातून आलेले समाजबांधव उपस्थित होते.

ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘विश्व ब्राह्मण पांचाळ समाजातील विलास मडपूवार, आबोजवार अशा अनेक जणांचा मला सहवास लाभला आहे. दुसऱ्याची रेष पुसण्यापेक्षा आपल्या समाजाची रेष कशी मोठी करता येईल, यासाठी सर्वांचे सदैव प्रयत्न असतात. हा समाज संस्कारित आहे. प्रगतिशील विचारांवर श्रद्धा ठेवणारा आहे. महत्त्वाचे म्हणजे सात्विक आणि प्रामाणिक आहे.’
आपल्या आडनावांमध्येच ‘वार’
गुणवंतांनी स्वार्थी होऊ नये

अनेकता मैं एकता, ये हमारी विशेषता
सभागृहासाठी पाच लक्ष

विश्व ब्राह्मण पांचाळ समाज समितीमार्फत संस्कार, अध्यात्मीक विचारांचे याचे आदान प्रदान व्हावे म्हणून परमपूज्य नागाचारी महाराजांच्या या जागेवर आपण एक सभागृह निर्माण करतो आहे. या संकल्पचित्राचे नुकतेच माझ्या हातून अनावरण झाले. या सभागृहासाठी मी ५ लक्ष रुपयांची मदत जाहीर करतो आहे, अशी घोषणा ना. श्री. मुनगंटीवार यांनी केली. ================================= *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ================================ कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,






















