*धनगर आरक्षणाच्या आमलबजावणी करिता शेणगाव येथे रास्तारोको .*

0
31

==================================

जिवती:

धनगर समाजाच्या नेत्यांनी पंढरपूर येथे आदिवासी समाजात धनगर समाजाचा समावेश करण्यासाठी बेमुदत उपोषण केले आणि मुख्यमंत्री यांचे मुख्य सचिव विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांची कमिटी स्थापन करून धनगड व धनगर हे एकच असल्याचे म्हटले आहे.                 
मुळात राज्यात धनगड जमात अस्तित्वात नाही जे आहे ते धनगर असल्याचे शपथपत्र सुद्धा शानसांने तीन वेळा मुबंई उच्च न्यायालयाला सादर केलेले आहे.धनगर च्या ऐवजी चुकीने धनगड झाले असल्याने व आता च्या अभ्यास गटाने सुद्धा महाराष्ट्रात धनगड हे धनगर असल्याचे स्पष्ट केले असल्याने आता धनगर जातीला त्वरित अनुसूचित जामातीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात यावेत या संदर्भात तालुक्यातील मुख्य ठिकाण शेणगाव येथे धनगर समाजातील लोकांनी रास्तारोको आंदोलन केला.                                               
यावेळी जिवती पोलीस स्टेशन चे ठाणेदार कांचन पांडे यांच्या मार्फत तहसीलदार,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी उपस्थित धनगर समाजाचे वरिष्ठ नेते मंगेश गुलवाडे,महेश देवकते,माधव डोईफोडे,शिवाजी श्रीरामे,गोविंद गोरे,रामचंद्र हाके,रामराव शेळके,रमाकांत माने,शंकरराव सोलनकर, खंडेराव सलगर,नामदेव सलगर,दत्ता माने,संग्राम बाजगीर,शिवाजी
आदी समाज बांधव यावेळी मोठया संख्येने उपस्थित होता.    ==================================          *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*       =================================            कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here