*श्याम बोबडे यांची भारतीय जनता पार्टी ओबीसी युवा मोर्चा महानगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती*

0
15

================================

चंद्रपूर: श्री. श्याम भारत बोबडे यांची भारतीय जनता पार्टी ओबीसी युवा मोर्चा, महानगर चंद्रपूरच्या जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. एक सर्वसाधारण भाजप कार्यकर्ता ते जिल्हाध्यक्ष पदा वर श्याम बोबडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बोबडे यांनी संपूर्ण योगदान पक्षाकरिता दिले आहे त्यांनी समाजात अनेक समाजकार्य केले आहे त्यांचा या कार्याची दखल घेऊन ना. सुधीर भाऊ मुनगंटीवार, मंत्री वणे, सांस्कृतिक व मत्स्य महाराष्ट्र राज्य यांचे मार्गदर्शनात तथा महानगर जिल्हाध्यक्ष राहुलजी पावडे यांच्या नेतृत्वात व ओबीसी महानगर अध्यक्ष मनोज पोतराजे यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आले आहे. बोबडे यांच्या नेतृत्वगुणांचा आणि पक्षनिष्ठेचा गौरव करत, त्यांची ही महत्त्वपूर्ण जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे.

श्री. बोबडे हे बालाजी वॉर्ड, चंद्रपूर येथील रहिवासी असून, त्यांनी गेल्या काही वर्षांपासून पक्षाच्या विविध कार्यांमध्ये आपले सक्रिय योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे पक्षाच्या उद्दिष्टपूर्तीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.     

ही नियुक्ती भाजप ओबीसी मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष श्री. मनोज पोतराजे यांच्या शिफारशीनुसार करण्यात आली आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते बोबडे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. भाजप महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांच्या सूचनेनुसार ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

श्री. श्याम बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी युवा मोर्चा महानगरात अधिक प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केला आहे. पक्षाच्या उद्दिष्टांची पूर्तता आणि युवा मोर्चाचे बळकटीकरण करण्यासाठी बोबडे यांच्या नेतृत्त्वाखाली संघटना प्रभावी भूमिका निभावेल, अशी अपेक्षा आहे. बोबडे यांच्या नियुक्तीमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.    ==================================          *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*  ==================================        कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here