==================================
दि.२१ आक्टोंबर २०२४
चामोर्शी:- नेताजी सुभाष चंद्र बहुउद्देशीय संगठन वसंतपुर द्वारा आयोजित भव्य फुटबॉल प्रतियोगिता बक्षीस समारोपीय कार्यक्रमाला माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते यांनी उपस्थित राहून बोलतांना आठ दहा दिवस फुटबॉल प्रतियोगिता मध्ये आपण सहभागी होऊ चांगल्या पद्धतीने हा फुटबॉल खेळ पार पाडला. आज दि.२१ आक्टोंबर रोजी फुटबॉल चा समारोप म्हणजे बक्षिस वितरणाचा कार्यक्रम असुन प्रतियोगिता म्हटलं तर हार जीत होणे साहजिकच आहे.विजयी संघाचे अभिनंदन परंतु पराजय संघाने पराजयाला हार न मानता पुढे प्रयत्न करत विजयी करावे. याबरोबरच गावातल्या कोणत्याही समस्या आणि अडीअडचणी असल्यास मी निश्चितच सोडवण्याचा प्रयत्न करीन. असा विश्वास देतोय आपण लोकसभेच्या निवडणूकीत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या केलेल्या सहकार्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो.असे प्रतिपादन या बक्षीस वितरण समारोपाला मा.खा.नेते यांनी केले.
या फुटबॉल प्रतियोगितेचा प्रथम बक्षीस आष्टी या चमूने रोख रक्कम – ३०,००१/-तिस हजार रूपये व ट्रॉफी तर द्वितीय बक्षीस वसंतपुर या चमुने रोख रक्कम -२०,००१/- व ट्रॉफी तसेच तृतीय बक्षीस सुभाषग्राम या चमूने रोख रक्कम-१०,००१/- व ट्रॉफी पटकावला असून या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थित पार पडला. ==============================
यावेळी फुटबॉल प्रतियोगितेच्या बक्षीस समारोप कार्यक्रमाला मंचावर प्रामुख्याने भाजपाचे सहकार आघाडी चे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशिषभाऊ पिपरे, सरपंच वसंतपुरच्या सष्टीताई सरकार,गौरीपुरचे सरपंच ह्रदय जी बाला, ग्रा.प.सदस्य दिपक मंडल, ग्रा.प.सदस्य संतोष कुंडु, सामाजिक नेते दिनेश मंडल, तारक हलदार,पलाश घरामी, कुमारेश मंडल,अमेद्र मंडल, कौशिक सरकार तसेच मंडळाचे पदाधिकारी व मोठया संख्येने गावातील नागरिक व खेळाडू उपस्थित होते. ================================ *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================== कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,
























