Home
Home चंद्रपूर *राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राजुरा चा विजयादशमी उत्सव स्थानिक रामनगर कॉलोनी येथील...

*राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राजुरा चा विजयादशमी उत्सव स्थानिक रामनगर कॉलोनी येथील रामबाग मैदानावर उत्साहात साजरा*

0
72

================================

*राजुरा *         =================================

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राजुरा नगराचा विजयादशमी उत्सव २०/१०/२०२४ रोजी स्थानिक रामबाग पटांगण, रामनगर कॉलोनी येथे उत्साहात संपन्न झाला, ह्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून “आदिवासी सेवक” सन्मान प्राप्त श्री वाघुजी गेडाम व प्रमुख वक्ता म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा सदभावना बैठक प्रमुख श्री. नितिनजी हिरुरकर तसेच रा.स्व संघाचे तालुका संघचालक राजेंद्रजी येणुगवार, राजुरा नगर कार्यवाह राकेशजी अल्लुरवार उपस्थित होते, कार्यक्रमापूर्वी उत्सव स्थानावरून जवाहर नगर मार्गे, पंचायत समिती मार्गाने कार्यक्रम स्थळापर्यंत स्वयंसेवकांचे पथसंचलन संपन्न झाले, ह्यावेळी स्वयंसेवकांचे योगव्यायाम व दंड प्रात्यक्षिक उपस्थितांचे समोर प्रदर्शन करण्यात आले, ह्यावेळी बोलताना माननीय मुख्य अतिथी श्री वाघुजी गेडाम ह्यांनी त्यांचा आयुष्यातले अनुभव कथन करत असताना आजचा समाजाला संघाची गरज आणि संघकार्य या बद्दल असलेल्या भ्रामक कथा पासून दूर राहत, या कार्यात स्वतः सहभागी होण्याचे व समजाला पण योग्य मार्गदर्शन करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले तसेच मुख्य वक्ते श्री नितिनजी हिरुरकर ह्यांनी श्री विजयादशमीचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेत असणारे महत्व विशद करताना 1925 साली विजयादशमीच्या दिवशी पूजनीय सरसंघचालक डॉक्टर हेडगेवारांनी संघस्थापणेच्या वेळी ज्या विचारांनी प्रेरित होऊन संघाची स्थापना केली त्या विचाराचे संगोपन करण्यासाठी अखंड प्रयत्नरत राहण्याची गरज प्रतिपादन केली, हिंदुधर्म हा केवळ धर्म नसून ती एक संस्कृती आहे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ १०० वर्ष पूर्ण करण्याची वाटचाल करत असताना मागील जवळपास शंभर वर्षे संघशक्तीला विरोध करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्ती आपल्या प्रयत्नात अयशस्वी झाल्याने आता या संस्कृतीवर आघात करून आपली शक्ती कमजोर करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याने हिंदू शक्तीने आता सतर्क राहण्याची गरज असून सर्व शक्तीने त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडणे गरजेचे असून त्याकरीता संघ व संघ विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहचणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले ,
ह्यावेळी प्रास्ताविक,परिचय केल्यावर मदतनिसांचे तसेच उपस्थित संघप्रेमी नागरिकांचे आभार हे राजुरा नगर चे नगर कार्यवाह श्री राकेशजी अल्लुरवार ह्यांनी मानले, कार्यक्रमाला स्वयंसेवकांसह संघप्रेमी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते,      =================================            *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*      =================================            कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here