================================
बल्लारपुर पोलीसांनी कठोर परिश्रम करुन भिवकुंड नाला विसापुर येथील हनुमानजीची मुर्तीची विटंबना करणाऱ्या आरोपीस पडकले. =============================
*बल्लारपूर* (वि. प्र.):बल्लारपुर पोलीसांनी अतिशय कठोर परिश्रम करुन भिवकुंड नाला विसापुर येथील हनुमानजी ची मुर्तीची विटंबना करणाऱ्या आरोपीस पडकले असून याबद्दल बल्लारपूर पोलिसांचे कौतुक केले जात आहे.
सविस्तर वृत्त असे की, पोलीस ठाणे बल्लारपुर हद्दीतील भिवकुंड नाला विसापुर येथील
मंदिरातील हनुमानजीची मुर्तीची विटंबना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने केल्याबाबत दिनांक १९/१०/२०२४ रोजी पोलीस ठाणे बल्लारपुर येथे गुन्हा रजि. क्रं. ९७१/२०२४ कलम-२९८ भारतीय न्याय संहिता-२०२४ अन्वये नोंद केला असुन सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध कामी गुन्हयाचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सुनिल गाडे पोलीस ठाणे बल्लारपुर यांनी विशेष तपास पथक तयार करुन अज्ञात आरोपीचा तांत्रीक पध्दतीने सखोल तपास करुन आरोपी निष्पन्न करुन आरोपीस दि.२५/१०/२०२४ रोजी अटक केले आहे.
सदर आरोपीस ताब्यात घेवुन त्याचेकडे चौकशी केली असता त्याचा व त्याचे पत्नीचा वाद झाल्याने व कौटुंबीक कलहामुळे त्याची पत्नी त्यास सोडुन तिचे माहेरी बाबुपेठ चंद्रपुर येथे गेली होती व तेथुन तिची आत्या राहणार बल्लारपुर हिचे घरी मुक्कामी गेली असता आरोपी हा पत्नीचे शोधात मोटार सायकलने चंद्रपुर येथुन बल्लारपुर जात असतांना सैनिक स्कुल जवळ त्याची मोटार सायकलची एक्सलेटर वायर तुटल्याने त्याने सदर मोटार सायकल रस्त्याचे कडेला उभी करुन मंदिराजवळ जावुन चंद्रपुर कडे जाणाऱ्या वाहन चालकाकडे लिफ्ट मागत होता. त्यास कोणीही लिफ्ट न दिल्याने व पहिलेचे कौटुंबिक कलहामुळे त्याने रागाचे भरात जवळच असलेल्या मंदिरातील हनुमानजीची मुर्ती तोडुन व ती गाभाऱ्या बाहेर फेकुन मुर्तीची विटंबना केली व तेथुन पायदळ चालत त्याचे घरी चंद्रपुर येथे निघुन गेला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु मॅडम, दिपक साखरे उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांचे मार्गदर्शनात पो.नि.सुनिल वि.गाडे,सपोनि. अंबादास टोपले, सफौ.गजानन डोईफोडे, आंनद परचाके,पोहवा. सुनिल कामटकर, पोहवा. पुरुषोत्तम चिकाटे, पोहवा. रणविजय ठाकुर, पोहवा. संतोष दंडेवार, पोहवा. संतोष पंडीत, सत्यवान कोटनाके, पोअं. विकास जुमनाके, शरदचंद्र कारुष, वशिष्ठ रंगारी, शेखर माथनकर, मिलींद आजम, भुषण टोंग, खंडेराव माने, लखन चव्हाण, मपोअं. अनिता नायडु इ. स्टॉफ यांनी केली आहे. ================================= *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================== कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*