=================================
*गडचिरोली भाजप कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक: डॉ. मिलिंदजी नरोटे यांना विजयी करण्यासाठी मा.खा. अशोकजी नेते यांचे मार्गदर्शन*
==============================
दिं. १० नोव्हेंबर २०२४
गडचिरोली:- डीएसआर नगर भवन, गडचिरोली येथे भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख कार्यकर्ते, बूथ प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुखांची एक महत्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. भाजपाच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. मिलिंदजी नरोटे यांना आगामी निवडणुकीत विजयी करण्यासाठी या बैठकीत विस्तृत संघटनात्मक मार्गदर्शन देण्यात आले. बैठकीचा समारोप मा. खा. तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांच्या उपस्थितीत करण्यात आला. अशोकजी नेते यांनी भाजपाच्या आगामी निवडणूक धोरणांवर सखोल मार्गदर्शन केले. प्रत्येक कार्यकर्ता, बूथ प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुखांनी भाजपाच्या धोरणांचे लाभ स्थानिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास प्राधान्य दिले पाहिजे, असे ते म्हणाले. जनतेच्या प्रश्नांना सोडवण्याबरोबरच त्यांच्याशी संवाद साधून भाजपाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याने घेण्याचे आवाहनही नेते यांनी केले. यावेळी नेते यांनी डॉ. मिलिंदजी नरोटे यांचे कार्य गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी कसे महत्वाचे आहे, हे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की ही संधी गडचिरोलीसाठी सुवर्णसंधी आहे. डॉ. नरोटे यांच्या अनुभवाचा लाभ मिळाल्यास क्षेत्रात विकासाची नवी पर्वणी साध्य होईल. ============================== बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक भूमिकेचा अभ्यास, प्रचार मोहिमांची आखणी, आणि आधुनिक साधनांचा वापर याबद्दल चर्चा झाली. प्रत्येक कार्यकर्त्याला निवडणुकीतील त्यांच्या जबाबदाऱ्यांचे महत्त्व पटवून देण्यात आले. कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे व डॉ. मिलिंदजी नरोटे यांना विजयी करण्याचे आश्वासन दिले. ============================= बैठक अत्यंत सकारात्मक वातावरणात पार पडली असून, भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये एकजुटीची भावना निर्माण झाली आहे. कार्यकर्ते आता पूर्ण आत्मविश्वासाने व जोमाने गडचिरोलीत भाजपाच्या महायुतीच्या विजयासाठी कार्यरत राहणार आहेत. यावेळी मंचावर प्रामुख्याने भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, समन्वयक प्रमोदजी पिपरे, भाजपाचे जेष्ठ नेते गजाननजी येंगदलवार, जेष्ठ नेते सुधाकरराव येंगदलवार, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारतजी खटी, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, कामगार आघाडी प्रदेश सदस्य गोवर्धन चव्हाण, ज्येष्ठ नेते प्रशांतजी भुगुवार तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शहर महामंत्री केशवभाऊ निंबोड यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला. ============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ============================= कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*