*_मतदान हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे मा.खा.अशोकजी नेते._*

0
2

===============================

*_मतदान हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे मा.खा.अशोकजी नेते._*

गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील चामोर्शी रोडवरील सायन्स कॉलेज या मतदान केंद्रावर माजी खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांनी आपल्या परिवारासह मतदानाचा हक्क बजावला.

मतदानानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी लोकशाहीच्या उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. “मतदान हा आपला अधिकारच नव्हे, तर लोकशाही सुदृढ करण्याचा एक महत्वपूर्ण मार्ग आहे. प्रत्येकाने उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावून एक जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडावे,” असे त्यांनी सांगितले.

लोकशाहीचे हात बळकट करण्यासाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठी मतदान हे अनिवार्य आहे. अशोकजी नेते यांच्या कुटुंबीयांनी देखील मतदानात सक्रिय सहभाग घेतला, ज्यामुळे लोकांना प्रेरणा मिळाली.

*मतदान करा, लोकशाही मजबूत करा*

मतदान हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. म्हणूनच प्रत्येकाने हा हक्क बजावत देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान द्यावे.        ================================              *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*      =============================                कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here