================================
*निर्भय सेवा फाऊंडेशनचा मदतीचा हात: गरीब कुटुंबाला दिला आधार.*
*भद्रावती*
निर्भय सेवा फाऊंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत पुन्हा एकदा आपला संवेदनशीलतेचा परिचय दिला आहे. संस्थेच्या वतीने एका गरीब कुटुंबाला मदतीचा हात पुढे करत, त्यांच्या दुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न करण्यात आला.
भद्रावती तालुक्यातील चेक बरांज या गावातील कुटुंबातील एक सदस्याचा अलीकडेच मृत्यू झाला होता. कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवत, फाऊंडेशनने अंत्यसंस्कारासाठी आवश्यक सामान पुरवून कुटुंबाला मोठा आधार दिला.
फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरज शहा आणि इतर सदस्यांनी स्वतः या कामात पुढाकार घेतला व कुटुंबाला मानसिक धीरही दिला. “समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीला मदतीचा हात देणे हीच आमची जबाबदारी आहे,” असे अध्यक्षांनी यावेळी सांगितले.
निर्भय सेवा फाऊंडेशन नेहमीच गरजूंसाठी विविध प्रकारच्या सेवाकार्यांत अग्रेसर राहिली आहे. गरिबांसाठी वैद्यकीय मदत, शिक्षणासाठी सहाय्य, तसेच नैसर्गिक आपत्तींच्या वेळी मदतकार्य असे अनेक उपक्रम राबवून संस्थेने सामाजिक कार्यात आपला ठसा उमटवला आहे.
या उपक्रमामुळे समाजातील गरजू लोकांसाठी मदतीचा एक आदर्श निर्माण झाला आहे. संस्थेच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कुटुंबातील परिवाराने निर्भय सेवा फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष सुरज शहा, दीपक तुरारे, सॅम्युअल गंधम, सुमित हस्तक, बालू जोगी, प्रवीण तुराणकर, कालिदास सेलोटे, हसन शेख, किशोर दिवसे, रोहन गज्जेवार, सुशांत रायपुरे, विशाल डोळस, गोपाल शहा, नयना गंधम, मुनमुन शहा, नेहा हस्तक, निकिता जनबंधू, माही तुरारे, तब्बसूम शेख, प्रिया जोगी, नीलिमा तुराणकर, करिष्मा झाडे, रवी झाडे, विवेक गोहणे व इतर सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. ================================ *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ============================== कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*