=============================
*चंद्रपूर*
बाबूपेठ रेल्वे ब्रिज अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उडान पूल सुरू झाला. परंतु त्या उडान पुलाची बांधणी वाहतुकीस जीवघेणी ठरली आहे. नागमोडी असणाऱ्या या उडानपुरावर सुरू झाला तेव्हापासून काही अवधीतच आतापर्यंत चार-पाच अपघात झाले.
आज दुपारी एक वाजता च्या दरम्यान बाबूपेठ वरून बागला चौकात कामानिमित्त टू व्हीलरवर जाणाऱ्या तीन मित्रांना मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. धडक देऊन अज्ञातवहान पसार झाले. त्यात आयरन विठ्ठल मेश्राम, साहिल संजय ढवस, सुयोग सुरेश डांगे पुलाच्या खाली उसळून गंभीर जखमी झाले . शासकीय रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले असता आयरन विठ्ठल मेश्राम 24 याचा मृत्यू झाला. तर दोन जखमी असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहे.
पुढील तपास शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक बागला चौकीचे पोलीस करीत आहेत. अपघात करून पसार झालेल्या अज्ञातवानाचा शोध सुरू आहे. =============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================== कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*