=======================
चंद्रपूर(का.प्र.): चंद्रपूर शहरात मागील काही दिवसापासून वाढलेल्या मोटारसायकल चोरीस प्रतिबंध करून चोरांचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणावेत याबाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रिना जनबंधू व उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांनी चंद्रपूर शहर व रामनगर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी आसिफराजा शेख यांना सूचना व मार्गदर्शन केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांनी रामनगर पोलीस स्टेशनचे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मोटारसायकल चोरी करणारे चोरांबाबत गोपनीय माहिती काढून चोरीचे गुन्ह्यांची उकल करण्याबाबत आदेशीत केले होते.
आसिफ राजा जेव्हापासून रामनगर पोलीस स्टेशन येथे कार्यरत झाले आहे तेव्हापासून ते गुन्हेगारासाठी कर्दनकाळ आहे हे मात्र विशेष!
रामनगर पोलीस स्टेशनच्या शोध पथकातील अधिकारी व अंमलदार पो.स्टे. रामनगर येथे दाखल अपराध क्र. 1198/2024 कलम 303 (2) बी.एन.एस. मधील चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना गोपनीय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा तसेच अन्य चोरीचे बरेच गुन्हे हे कपील प्रभू मेश्राम, वय- 33 वर्षे, रा. फुकटनगर, परिवर्तन चौक, राजीव गांधी नगर, चंद्रपूर याने केला आहे. त्यानुसार त्याचा शोध घेत असताना तो वारंवार त्याचे राहण्याचे ठिकाण बदलत होता. त्यानुसार पोलीसांनी सतत त्याच्या मागावार राहून त्याचा ठाव ठिकाणा शोधून त्यास दि. 21/01/2025 रोजी ताब्यात घेऊन अटक केली. त्यास विश्वासात घेऊन विचारपूस सुरू केली त्याने सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबूली देऊन सदर गुन्ह्यासोबत चंद्रपूर शहर, भद्रावती, रामनगर ईत्यादी पोलीस स्टेशन हद्दीत मोटारसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबूली दिली.
त्याचेकडून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली होंडा कंपनीची प्लेझर मोपेड गाडी क्र. एम.एच. 34, व्ही. 6289 हीचेसोबत अन्य 08 अशा एकूण 09 मोटारसायकल एकूण 4,08,000/- रूपये किंमतीच्या मुद्देमाल जप्त केला आहेत.
त्यासंदर्भात खालील गुन्हे दाखल असून ते उघडकीस आले असून अन्य मोटारसायकल संदर्भात दाखल गुन्ह्याबाबत माहिती घेऊन आरोपीस गुन्ह्यामध्ये वर्ग करण्याची तजवीज ठेवली आहे.
1) पोलीस स्टेशन रामनगर अपराध क्र. 1182/2024 कलम 303 (2) भा.न्या.सं. 2) पोलीस स्टेशन रामनगर अपराध क्र. 1186/2024 कलम 303 (2) भा.न्या. सं. 3) पोलीस स्टेशन रामनगर अपराध क्र. 1198/2024 कलम 303(2) भा.न्या. सं. 4) पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर अपराध क्र. 1159/2024 कलम 303(2) भा.न्या. सं. नुसार तसेच 5) पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर अपराध क्र. 1026/2024 कलम 303(2) भा.न्या. सं.नुसार वरील कारवाई ही पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू व उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक असिफराजा शेख, सहा. पोलीस निरीक्षक देवाजी नरोटे, सहा. पोलीस निरीक्षक हनुमान उगले, पोलीस अंमलदार आनंद खरात, सचिन गुरनुले, लालू यादव, पेतराज सिडाम, प्रशांत शेंदरे, शरद कुडे, मनिषा मोरे, अमोल गिरडकर, रविकुमार ढेंगळे, संदिप कामडी, हिरा गुप्ता, पंकज ठोंबरे, प्रफुल पुप्पलवार, ब्ल्युटी साखरे यांनी केली आहे. ================================ *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ===============================
हॅलो चांदा न्यूज
मुख्य संपादक
शशी ठक्कर
9881277793
कार्यकारी संपादक, शशिकांत मोकाशे उपसंपादक,विनोद शर्मा,9422168969
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356