============================
मतदार संघाच्या विकासकामांवर सविस्तर चर्चा
चंद्रपूर, ( का, प्र,),विधानसभा मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई मंत्रालय येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीमध्ये मतदार संघातील विविध विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आमदार जोरगेवार यांनी मतदार संघातील प्रलंबित विकासकामे, नवीन प्रकल्प आणि आवश्यक निधी यासंदर्भात उपमुख्यमंत्र्यांसमोर मागण्या मांडल्या.
या चर्चेदरम्यान, चंद्रपूर मतदार संघातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्याची गरज असल्याचे अजित पवार यांनी मान्य केले. त्यांनी या विकासकामांना प्राधान्याने मंजुरी देण्याचे आश्वासन दिले. विशेषतः रस्ते, पूल, जलसंधारण प्रकल्प, आणि सार्वजनिक आरोग्य सेवांसाठी आवश्यक सुविधा या विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.
आमदार किशोर जोरगेवार यांनी मतदार संघातील कृषी क्षेत्राच्या सुधारणांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी नवीन योजनांच्या अंमलबजावणीबाबतही सविस्तर चर्चा केली. यामध्ये सिंचन प्रकल्प, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब आणि शेतकरी उत्पादने बाजारपेठेत सहज विक्रीसाठी आवश्यक धोरणे राबविण्याची मागणी करण्यात आली.
औद्योगिक विकासाच्या अनुषंगाने, स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत अशी मागणीही आमदार जोरगेवार यांनी केली. या चर्चेत चंद्रपूर मतदारसंघातील रोजगार निर्मितीवर भर देण्यात आला. स्थानिक युवकांना अधिक संधी मिळाव्यात यासाठी नवीन औद्योगिक संकुले, प्रशिक्षण केंद्रे आणि स्टार्टअप्ससाठी विशेष प्रोत्साहन देण्याबाबत ही चर्चा करण्यात आली. यासोबतच, नागरी सुविधा सुधारण्यासाठी पाणीपुरवठा, स्वच्छता मोहिमा, कचरा व्यवस्थापन आणि स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत प्रस्तावित प्रकल्पांची माहिती आमदार जोरगेवार यांनी मांडली.
यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर, मतदार संघातील विकास योजनांना लवकरच गती मिळेल असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला. ============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================
*हॅलो चांदा न्यूज,मुख्य संपादक,शशी ठक्कर,*
*9881277793,*
*कार्यकारी संपादक, शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक,विनोद शर्मा,9422168969*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356