================================
*चंद्रपूर*
हॅलो चांदा न्युज
चंद्रपूर(का.प्र.): महाराष्ट्र आरोग्यमित्र कर्मचारी संघटना (सी.आय.टी. यू संलग्न) चे राज्यव्यापी संपांतर्गत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन केले जात आहे.कर्मचारीच्या विविध मागण्यासाठी हे,धरणे आंदोलन चंद्रपूर येथेही सुरू करण्यात आले असून एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत
आरोग्यमित्र शासन व्यवस्थेतील दुर्लक्षित घटक यांच्याकडून हे धरणे आंदोलन केले जात आहे.
हा राज्यव्यापी संप विविध कारणामुळे केला जात आहे.
संपाची कारणे:
१.आरोग्यमित्रांना दरमहा रु. २६,००० वेतन देण्यात यावे व किमान वेतन कायद्यानूसार स्पेशल अलाउन्स तथा महागाई भत्ता देण्यात यावा.२. वेतनात दरवर्षी १० टक्के वाढ करण्यात यावी.३. सर्व आरोग्यमित्रांना आजारपणाच्या रजा (एस. एल.) १०, किरकोळ रजा (सि.एल.) १०, विशेष अधिकार रजा (पी.एल.) ३०, सणाच्या सुट्या १० लागू कराव्यात.४. ॲपरॉन ऐवजी फॉर्मल ड्रेस देण्यात यावा.५.ई.एस.आय.सी मधील त्रुटींची पूर्तता लवकारात लवकर करून सर्व आरोग्यमित्रांना ई.एस. आय.सी. कार्ड देण्यात यावे.६. कोविड सारख्या जागतिक महामारीत केलेल्या कामाचा मोबदला /जोखीम भत्ता देण्यात यावे.७. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे सन २०१८ पासून विना वेतन करीत आहेत. सन २०१८ पासून जॉयनिंग लेटर व मोबदला देण्यात यावा. व जॉयनिंग लेटरवर एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असा उल्लेख असावा.८. आरोग्यमित्राचे शासन स्तरावर (SHAS) मध्ये समायोजन करण्यात यावे.९. आरोग्यमित्रांचे इतर जिल्हयात व तालूक्याच्या ठिकाणी बदलीचे धोरण रद्द करावे.१०. आरोग्यमित्र रमेश पंडीत वैसाने यांना पूर्ववत कामावर रुजू करून घेण्यात यावे. तसेच गणेश अशोक शिंटे यास पूर्वीप्रमाणे नाशिक मध्ये कामावर घेण्यात यावे.११. टी.पी.ए. बदलल्यानंतर नविन टी.पी.ए. मार्फत आरोग्यभित्र काम करतात परंतु ५ वर्षापेक्षा जास्त सेवा होउनही आरोग्यमित्रांना उपदान दिले नाही तरी सदरचे उपादन देण्यात यावे.अशी एकूण 11 संपाची कारणे त्यांनी काढलेल्या पत्रकात नमूद केलेली आहे.
हे धरणे आंदोलन चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटना सी.आय. टी.यु. सलग्न) च्या माध्यमातून सुरू असून आज दिनांक 18 फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ मार्गदर्शक किशोर जामदार तसेच राजेश पिंजरकर यांनी उपस्थितांना यथोचित मार्गदर्शन करीत शासन स्तरावर योग्य ती कारवाई करून आरोग्य मित्रांना न्याय देण्यात यावा असे सांगितले.
या धरणे आंदोलनात (महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटना सी.आय. टी.यु. सलग्न) च्या चंद्रपूर जिल्ह्याच्या अध्यक्ष अनिता आक्केवार, राजेश पिंजरकर, अरुण भेलके, आशिष जेनेकर, गणेश वडस्कर, राकेश रुयारकर, वैभव बावणे, गिरीश शेंडे, सपना सातपुते, कैलाश रामटेके, अर्चना देवगडे, स्वप्निल पाचभाई, शुभम राठोड, मनोज धोटे, अमोल भोंग, सह अनेक मान्यवराची उपस्थिती होती. ======================= *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ======================
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356